Join us  

विरळ झालेल्या केसांसाठी वरदान, नवीन केस उगवतील, फक्त खोबरेल तेलात मिसळून १ पदार्थ लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2024 6:07 PM

Health Benefits of Coconut Oil for Your Hair - Mix 3 Ingredients in Hair Oil : केस गळतीमुळे तुम्हीही त्रस्त असाल तर, या पद्धतीने खोबरेल तेलाचा वापर करून पाहा..

केस गळणे ही सध्या कॉमन समस्या बनली आहे (Hair care Tips). बरेच लोक केस गळतीमुळे त्रस्त  आहेत. केस वाढण्याचे अनेक फंडे बाजारात उपलब्ध आहेत. पण यात केमिकल रासायनिकचा वापर जास्त प्रमाणात होतो (Hair Loss Problem). ज्यामुळे केस अधिक प्रमाणात खराब होतात. केसांना फक्त पोषण बाहेरून नसून, आहारातून देखील पोषण मिळणे गरजेच आहे.

केसांची निगा राखण्यासाठी आपण खोबरेल तेलाचा वापर करतो. पण फक्त केसांसाठी खोबरेल तेलाचा वापर करू नका. त्यात आपण ३ पैकी १ पदार्थ मिसळू शकता. यामुळे केसांच्या वाढीस मदत मिळू शकते. केस वाढतील यासह केसांच्या इतरही समस्या सुटतील(Health Benefits of Coconut Oil for Your Hair - Mix 3 Ingredients in Hair Oil).

केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेलाचा वापर कसा करावा?

कांद्याचा रस

कांद्याच्या रसामध्ये मुबलक प्रमाणात सल्फर असते, जे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असते. ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात. आपण केसांवर खोबरेल तेलात कांद्याचा रस मिसळून लावू शकता. तासाभरानंतर केस शाम्पूने धुवा. यामुळे केसांच्या वाढीस मदत होईल.

भातातून जळका वास - भाजीत जास्त मीठ पडलं? ५ किचन हॅक्स; स्वयंपाक होईल परफेक्ट

एलोवेरा जेल

एलोवेरा जेलमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात. ज्यामुळे सकाल्पचे आरोग्य सुधारण्यासही मदत होईल. हे केसांच्या मुळांचे पोषण करते आणि त्यांना मजबूत करते. खोबरेल तेलात एलोवेरा जेल मिसळून लावल्याने टाळूमध्ये आर्द्रता टिकून राहते आणि केस गळणे कमी होते.

पांढरे केस डायशिवाय होतील काळे, फक्त ४ पैकी १ पदार्थ न चुकता खा; केस होतील दाट - दिसतील सुंदर

कडीपत्ता

कडीपत्त्यात बायोटीन आणि प्रोटीन असते. जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. केसांच्या योग्य वाढीसाठी खोबरेल तेल एका वाटीत गरम करण्यासाठी ठेवा. त्यात कडीपत्ता घाला. काही वेळानंतर गॅस बंद करा. तेल गाळून केसांना लावून सकाल्पवर मसाज करा. ५ ते ६ तासानंतर केस शाम्पू धुवा. 

टॅग्स :केसांची काळजीत्वचेची काळजी