Lokmat Sakhi >Beauty > केस धुताना खूप तुटतात? ५ सोपे उपाय, भराभर वाढतील केस, होतील काळेभोर

केस धुताना खूप तुटतात? ५ सोपे उपाय, भराभर वाढतील केस, होतील काळेभोर

Health tips to prevent hair fall : त्वचारोग तज्ज्ञांच्या मते केसांशी संबंधित बहुतेक समस्या खराब जीवनशैली आणि अस्वस्थ आहारामुळे होत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 03:49 PM2023-03-30T15:49:14+5:302023-03-30T16:15:13+5:30

Health tips to prevent hair fall : त्वचारोग तज्ज्ञांच्या मते केसांशी संबंधित बहुतेक समस्या खराब जीवनशैली आणि अस्वस्थ आहारामुळे होत आहेत.

Health tips to prevent hair fall : How to prevent hair loss and improve hair health | केस धुताना खूप तुटतात? ५ सोपे उपाय, भराभर वाढतील केस, होतील काळेभोर

केस धुताना खूप तुटतात? ५ सोपे उपाय, भराभर वाढतील केस, होतील काळेभोर

आपले केस लांब असावेत किंवा शॉर्ट असलेत तरी दाट, शायनी असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र आजकाल चुकीच्या पद्धतीचे खाणे पिणे आणि व्यस्त जीवनशैलीमुळे केस गळण्याची समस्या सामान्य झाली आहे. केस गळणे, गळणे, पांढरे होणे, कोंडा होणे यासारख्या समस्यांशी लोक मोठ्या प्रमाणात लोक संघर्ष करत आहेत. (Health tips to prevent hair fall)

हे टाळण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत आहेत.  त्वचारोग तज्ज्ञांच्या मते केसांशी संबंधित बहुतेक समस्या खराब जीवनशैली आणि अस्वस्थ आहारामुळे होत आहेत. केसांवर केमिकलयुक्त पदार्थांचा वापर केल्यानेही अनेक समस्या निर्माण होत आहेत. हेअर केअर रूटीनमध्ये ५ गोष्टी लक्षात ठेवल्या तर केसांचं होणारं  नुकसान टाळता येऊ शकतं. (How to prevent hair loss and improve hair health)

१) कोरड्या स्कॅल्पमुळे कोंड्याची समस्या होते आणि केस खराब होतात. त्यामुळे केस मजबूत, जाड आणि काळे करण्यासाठी आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा शॅम्पूने केस धुवा आणि कंडिशनर वापरा. केसांमध्ये ओलावा टिकवून ठेवल्यास कोंडा, केस गळणे आणि पांढरे केस या समस्यांपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता.

२) शारीरिक हालचाली केल्यास केस मजबूत आणि दाट राहतात. व्यायाम करणे खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीराचे कार्य सुरळीत राहते आणि योग्य प्रमाणात पोषक तत्व केसांपर्यंत पोहोचतात. केस सुकवण्यासाठी जास्त हेअर ड्रायर वापरत असाल तर कमी करा. महिलांनी वेणी जास्त घट्ट बांधू नये.

३) त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, पौष्टिक आहार घेतल्यानेच केसांच्या बहुतेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात, त्यामुळे आहारात हंगामी फळे आणि भाज्या ठेवा. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने काही सप्लिमेंट्स देखील घेऊ शकता.

४) आठवड्यातून किमान दोनदा टाळूची मसाज करा. याचे फायदे प्रचंड आहेत. खोबरेल तेलाने मसाज करू शकता. तुम्ही इतर कोणत्याही तेलानेही मसाज करू शकता. मसाजमुळे केसांच्या मुळांना रक्तपुरवठा होतो आणि पोत सुधारतो, केसांच्या समस्या दूर होतात.

५) तुमचे केस पांढरे होत असतील तर रासायनिक रंग टाळावेत. असे केल्याने केसांची चमक निघून जाते आणि केस फुटू शकतात. रंगाचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा.

Web Title: Health tips to prevent hair fall : How to prevent hair loss and improve hair health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.