Join us  

१ खास ज्यूस रेसिपी; तज्ज्ञ सांगतात हे ज्यूस प्या, वाढते वय चेहऱ्यावर दिसणार नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2022 4:55 PM

Healthy Anti Aging Juice by Dietician Anjali Mukerjee : सुरकुत्या कमी होण्यासाठीचा ज्यूस कसा तयार करायचा आणि त्याचे काय फायदे होतात पाहूया.

ठळक मुद्देइन्स्टाग्रामवर असंख्य फॉलोअर्स असून या माध्यमातून त्या आपल्या चाहत्यांना काही ना काही माहिती देण्याचा प्रयत्न करत असतात. पार्लरच्या उपचारांपेक्षा शरीराला पोषण देणारे उपाय केलेले केव्हाही चांगले

आपण दिर्घकाळ तरुण दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. पण कधीतरी आपलं वय वाढणार आणि हे वाढलेलं वय चेहऱ्यावर दिसणार हे साहजिकच आहे. चेहऱ्यावर सुरकुत्या येण्यामागे अनेक कारणे असतात. आनुवंशिकता, ताण, इतर तक्रारी, वाढते वय यांमुळे या सुरकुत्यांचे प्रमाण वाढत जाते. मात्र आपण कायम तरुण दिसलो तर कोणाला नको आहे? यासाठी मग आपण कधी पार्लरचे उपचार करतो तर कधी बाजारात मिळणारी महागडी क्रीम्स लावतो. पण यामुळे तात्पुरता उपाय होत असून कायमस्वरुपी फायदा होतोच असे नाही (Healthy Anti Aging Juice by Dietician Anjali Mukerjee). 

(Image : Google)

म्हणूनच प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी व्हाव्यात यासाठी एक सोपा उपाय सांगतात. नियमितपणे १ ज्यूस प्यायल्यास चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होण्याबरोबरच आरोग्यासाठी इतरही अनेक फायदे होतात. अंजली मुखर्जी यांचे इन्स्टाग्रामवर असंख्य फॉलोअर्स असून या माध्यमातून त्या आपल्या चाहत्यांना काही ना काही माहिती देण्याचा प्रयत्न करत असतात. आता सुरकुत्या कमी होण्यासाठीचा ज्यूस कसा तयार करायचा आणि त्याचे काय फायदे होतात पाहूया. 

साहित्य - 

१. आवळा - १ 

२. डाळींबाचे दाणे - १ कप 

३. काळी द्राक्षे - १ कप 

४. चाट मसाला - चवीपुरता 

५. मीठ - चवीपुरते

कृती -

१. सगळी फळे स्वच्छ धुवून घ्या.

२. त्यामध्ये चवीसाठी मीठ आणि चाट मसाला घालून हे सगळे मिक्सर किंवा फूड प्रोसेसरमध्ये फिरवून घ्या. 

३. तयार झालेला हा फ्रेश ज्यूस नियमितपणे प्या. 

फायदे -

१. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी सर्वात जास्त प्रमाणात असते. तसेच आवळ्यामध्ये तुम्हाला टवटवीत करणारे बरेच घटक असतात. त्यामुळे आवळा शरीरासाठी अतिशय फायदेशीर असणारा घटक आहे. 

२. डाळींब हेही आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असे फळ आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंटस , व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, पोटॅशिअम, फोलिक अॅसिड, लोह असे घटक असतात. डाळींबामुळे आपली त्वचा स्मूद आणि चांगली होण्यास मदत होते. तसेच डाळींबामुळे अल्झायमर, हृदयरोग यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. 

३. काळ्या द्राक्षांमध्येही अनेक उपयुक्त घटक असतात. कॅन्सरविरोधी लढण्यासाठी, रक्तवाहिन्यांच्या भिंतींवरील ताण कमी करण्यासाठी आणि रक्तदाबाची समस्या कमी करण्यासाठी ही द्राक्षे उपयुक्त ठरतात.    

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीआहार योजना