Lokmat Sakhi >Beauty > मोठे कानातले घातल्यावर कान दुखतात? अभिनेत्रींप्रमाणे ३ गोष्टी करा, जड-लोंबते कानातले घाला बिंधास्त

मोठे कानातले घातल्यावर कान दुखतात? अभिनेत्रींप्रमाणे ३ गोष्टी करा, जड-लोंबते कानातले घाला बिंधास्त

Heavy Earrings Hack: मोठमोठाले हेवी कानातले सतत घालूनही सेलिब्रिटींचे कान कसे काय दुखत नाहीत बरं?(3 tricks and tips from celebrities to wear heavy earrings comfortably)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2025 17:30 IST2025-03-21T09:19:44+5:302025-03-21T17:30:57+5:30

Heavy Earrings Hack: मोठमोठाले हेवी कानातले सतत घालूनही सेलिब्रिटींचे कान कसे काय दुखत नाहीत बरं?(3 tricks and tips from celebrities to wear heavy earrings comfortably)

Heavy earrings hack, 3 tricks and tips from celebrities to wear heavy earrings comfortably | मोठे कानातले घातल्यावर कान दुखतात? अभिनेत्रींप्रमाणे ३ गोष्टी करा, जड-लोंबते कानातले घाला बिंधास्त

मोठे कानातले घातल्यावर कान दुखतात? अभिनेत्रींप्रमाणे ३ गोष्टी करा, जड-लोंबते कानातले घाला बिंधास्त

Highlightsअभिनेत्री हेवी कानातले घालण्याच्या आधी काही ट्रिक्स फॉलो करतात आणि नंतर मोठमोठाले लोंबते कानातले घालतात..

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे लग्न म्हटलं की नेहमीपेक्षा थोडेसे हेवी दागिने घालण्यास आपण प्राधान्य देतो. गळ्यातले, बांगड्या असं हेवी घातलं तरी चालतं. पण जर मोठे लोंबते कानातले घातले तर मात्र काही जणींचे कान लगेच दुखायला लागतात. मग अशावेळी प्रश्न पडतो की आपले कान अगदी तास दोन तासातच दुखतात. मग अभिनेत्री रोजच एवढे हेवी कानातले कसे बरं घालू शकत असतील? याचं एकच उत्तर म्हणजे अभिनेत्री हेवी कानातले घालण्याच्या आधी काही ट्रिक्स फॉलो करतात आणि नंतर मोठमोठाले लोंबते कानातले घालतात (Heavy earrings hack). त्यामुळे ते कितीही वेळ कानात राहिले तरी त्यांना सहन होतात. त्या टिप्स आणि ट्रिक्स नेमक्या कोणत्या ते पाहुया..(3 tricks and tips from celebrities to wear heavy earrings comfortably) 

 

मोठमोठाले झुमके घातल्यानंतर कान दुखू नये म्हणून काय करावं?

मोठमोठाले लोंबते झुमके कानात घातल्यानंतरही आपल्याला अगदी कम्फर्टेबल राहता यावं, कानाला आराम मिळावा आणि ते दुखू नयेत यासाठी कोणत्या गोष्टी करता येतील याविषयीची माहिती fashion_fitness_by_dimpy या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी ३ महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत. 

चॉकलेटचा छोटासा तुकडा बघा काय कमाल करतो! वाचा चॉकलेट खाण्याचे ३ जबरदस्त फायदे

१. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे जर तुम्हाला खूप मोठे हेवी कानातले घालायचे असतील तर ते कानात घालण्यासाठी कान सहारा या वस्तूचा उपयोग करा. हा एकप्रकारचा पारदर्शक दोरा असतो. तो आपल्या कानाला गुंडाळला जातो. या दोऱ्यामुळे कानाच्या पाळ्यांवर जास्त जोर येत नाही आणि कानातले आपण कितीही वेळ सहन करू शकतो. हे कान सहारा तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी सहज मिळतील. 

 

२. दुसरी गोष्ट म्हणजे कानाला आधी बँडेज लावून घ्या आणि त्यानंतर कानातले घाला. यामुळे कानातल्याचा त्रास थेट तुमच्या कानांना होणार नाही. 

Long Lasting Lipstick: ओठांवरची लिपस्टिक तासनतास राहील जशासतशी! कियारा आडवाणी सांगते खास ट्रिक

३. तिसरी आणि महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा तुम्हाला असे मोठमोठाले हेवी कानातले घालायचे असतील तेव्हा सगळ्यात आधी कानाला थोडसं नंबिंग क्रीम लावा. हे क्रीम तुम्ही कोणत्याही मेडिकलमधून विकत घेऊ शकता. क्रीम कानाला लावल्यानंतर तुमचा कान दुखावला जाणार नाही. 


 

Web Title: Heavy earrings hack, 3 tricks and tips from celebrities to wear heavy earrings comfortably

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.