केसांच्या अनेक समस्यांसाठी फार पूर्वीपासून मेहेंदी लावणे हा एक उत्तम गुणकारी उपाय मानला जातो. प्रामुख्याने जेव्हा आपले केस पांढरे होतात तेव्हा बरेचजण केसांना मेहेंदी (heena mix for scalp treatment) लावण्याचा पर्याय निवडतात. सफेद केस नैसर्गिकरित्या जर काळे करायचे असेल तर, मेहेंदी लावली जाते. याचबरोबर केसांच्या अनेक लहान - सहान समस्यांसाठी केसांना मेहेंदी लावणे फायदेशीर ठरते. केसांची निगा राखण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात केसांकडे लक्ष द्यायलाच जमेल असे नाही. काही वेळेला केसांकडे दुर्लक्ष होते. ज्यामुळे केसांच्या निगडीत समस्या वाढतात. केसांत कोंडा होणे, केस गळती, स्कॅल्पला सतत खाज येणे, स्कॅल्पवर पुरळ येणे अशा अनेक समस्या उद्भवतात(Can I use henna on my scalp).
केसांच्या अनेक समस्या कायमच्या सोडवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे महागडे प्रॉडक्ट्स वापरुन पाहतो. बाजारांत मिळणाऱ्या या प्रॉडक्ट्समध्ये भरपूर प्रमाणात केमिकल्स असते. या केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर केल्याने केसांच्या समस्या कमी होण्याऐवजी अधिकच वाढू लागतात. असे होऊ नये म्हणून हे रासायनिक, केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा आपण नैसर्गिक घरगुती (Heena For Hair) उपायांचा वापर करु शकतो. केसांचे आरोग्य व सौंदर्य अधिक खुलून येण्यासाठी मेहेंदीचा फार वर्षांपासून वापर केला जात आहे. आपण देखील केसांच्या अनेक समस्यांवर मेहेंदीचा सर्वोत्तम उपाय नक्कीच करुन पाहू शकतो(Natural Heena Hair Treatment).
केसांच्या अनेक समस्यांवर मेहेंदीचा वापर कसा करावा ?
१. मेहेंदी व केळं :- केसांना मेहेंदी लावताना आपण त्यात केळं देखील मिक्स करुन लावू शकतो. केळ्यामध्ये भरपूर प्रमाणांत अँटीऑक्सिडंट्स असतात, मेहेंदी आणि केळ्याचे मिश्रण स्कॅल्पवर लावल्याने स्कॅल्पवर खाज येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. यासाठी एका बाऊलमध्ये मेहेंदी घेऊन त्यात पाणी मिसळून मेहेंदीची पेस्ट तयार करा. आता एका वेगळ्या बाऊलमध्ये केळ मॅश करून घ्यावे त्यात थोडीशी मेहेंदी पावडर घालून त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट मेहेंदीमध्ये मिक्स करावी. अशी मेहेंदी केसांवर लावून १ तास ठेवावी, त्यानंतर पाण्याने केस धुवून घ्यावेत.
२. मेहेंदी व मुलतानी माती :- मुलतानी माती ही त्वचेच्या सौंदर्यासाठी फायदेशीर मानली जाते तशीच ती केसांसाठी देखील ती फायदेशीर असते. जर आपल्या केसात वारंवार कोंडा होत असेल तर त्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे. केसांतील कोंडा दूर करण्यासाठी प्रत्येकी १ टेबलस्पून मेहेंदी व मुलतानी माती घेऊन पाण्यांत भिजवून त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट केसांवर लावून मग ३० मिनिटांनी केस धुवून घ्यावेत, यामुळे केसांतील कोंडा दूर होण्यास मदत होते.
वारंवार केसांना हेअर कलर करूनही केसांचा रंग फिकट होऊ नये म्हणून ७ चुका टाळा...
३. मेहेंदी आणि नारळाचे दूध :- मेंदीमध्ये नारळाचे दूध मिसळून ते मिश्रण स्कॅल्पवर लावा. नारळाच्या दुधाचा वापर शॅम्पू आणि कंडिशनर बनवण्यासाठीही केला जातो. नारळाचे दूध किंचित गरम करून त्यात मेंदी पावडर मिसळा. त्यात थोडे ऑलिव्ह ऑईलचे थेंबही घालू शकता. हे मिश्रण तयार झाल्यावर ते स्कॅल्पवर लावा. १ तासानंतर, शॅम्पू आणि पाण्याच्या मदतीने केस स्वच्छ धुवून घ्यावेत. हे मिश्रण तुम्ही आठवड्यातून दोन वेळा वापरू शकता. नारळाच्या दुधात लॉरिक अॅसिड असते. त्याच्या प्रतिजैविक गुणधर्मांमुळे, ते स्कॅल्पशी संबंधित अनेक समस्यांवर उपयुक्त ठरते.
४. मेहेंदी व लिंबाचा रस :- मेहेंदी पावडरमध्ये लिंबाचा रस मिसळून लावल्यास केसांच्या सौंदर्यात अधिक भर पडते. जर आपल्या केसात भरपूर कोंडा झाला असेल किंवा स्कॅल्पला सारखी खाज येत असले तर हा उपाय फायदेशीर ठरेल. मेहेंदीमध्ये लिंबाचा रस मिसळून स्कॅल्पला लावल्यास सतत येणारी खाज व कोंड्याची समस्या कायमची दूर होते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन - सी असते. याच्या वापराने खाज आणि कोंडा या दोन्ही समस्यांपासून आराम मिळतो. यासाठी मेहेंदी पावडरमध्ये लिंबाचा रस मिसळून ही तयार पेस्ट केसांना लावून घ्यावी. २ तास ही पेस्ट केसांवर अशीच ठेवून द्यावी त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत.
कितीही शाम्पू - कंडिशनर वापरले तरी केसगळती होतेच ? करा १ सोपी योगमुद्रा, केस गळणे बंद...
५. मेहेंदी व मेथीच्या बिया :- केसांसाठी मेहेंदी व मेथी हे दोन्ही घटक अतिशय फायदेशीर ठरतात. ज्या लोकांचे केस खूप कोरडे व रुक्ष असतात त्यांना अनेकदा कोंड्याची समस्या जाणवते. याचबरोबर जर स्कॅलपशी संबंधित अनेक समस्या असतील तर त्यावर मेहेंदी व मेथीच्या बियांचा उपाय करणे फायदेशीर ठरते. मेहेंदी व मेथीच्या बियांचे मिश्रण टाळूला मॉइश्चराइज ठेवण्यास मदत करते. यासाठी मेथीच्या बियांची पावडर व दही यांची पेस्ट बनवून ती रात्रभर तशीच भिजत ठेवावी. दुसऱ्या दिवशी भिजवलेल्या मेहेंदी मध्ये ही मेथी बिया व दह्याची पेस्ट घालावी. ही तयार पेस्ट केसांवर लावून १ तास तशीच ठेवून द्यावी. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत.
स्किन स्पेशालिस्ट सांगतात केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत, केसगळती - पांढरे केस समस्याच संपतील...