Lokmat Sakhi >Beauty > केस पांढरे झालेत - गळतातही फार? 'या' पद्धतीने केसांना मेहेंदी लावा; लांब केसांचं सिक्रेट

केस पांढरे झालेत - गळतातही फार? 'या' पद्धतीने केसांना मेहेंदी लावा; लांब केसांचं सिक्रेट

Henna/ Mehndi Hair pack to stop hairfall & get long hair : मेहेंदी लावल्यावर केस रुक्ष होत असतील तर, 'या' पद्धतीने केसांना मेहेंदी लावा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2024 10:00 AM2024-08-14T10:00:03+5:302024-08-14T10:05:01+5:30

Henna/ Mehndi Hair pack to stop hairfall & get long hair : मेहेंदी लावल्यावर केस रुक्ष होत असतील तर, 'या' पद्धतीने केसांना मेहेंदी लावा..

Henna/ Mehndi Hair pack to stop hairfall & get long hair | केस पांढरे झालेत - गळतातही फार? 'या' पद्धतीने केसांना मेहेंदी लावा; लांब केसांचं सिक्रेट

केस पांढरे झालेत - गळतातही फार? 'या' पद्धतीने केसांना मेहेंदी लावा; लांब केसांचं सिक्रेट

केसांना मेहेंदी लावण्याचा ट्रेण्ड फार पूर्वीपासून सुरु आहे. बऱ्याच महिला केसांना मेहेंदी लावतात (Hair care Tips). केसांना मेहेंदी लावल्याने केस सुंदर, चमकदार आणि मोकळे होतात (Beauty Tips). केमिकल रसायनयुक्त डायपेक्षा नैसर्गिक केव्हाही उत्तम. केस पांढरे झाल्यावर किंवा केसांची गळती होत असल्यास आपण मेहेंदी लावतो.

काही महिला मेहेंदीमध्ये काहीही मिक्स न करता केसांना लावतात. मात्र, आपण मेंहदीमध्ये काही घटक मिक्स करून लावले तर अधिक फायदा होतो. केसांची वाढ व्हावी यासाठी मेहेंदीमध्ये नेमकं काय मिक्स करावं? मेहेंदी भिजवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? पहा(Henna/ Mehndi Hair pack to stop hairfall & get long hair).

छोट्याशा कुंडीत लावा विड्याच्या पानाचा सुंदर वेल, ५ गोष्टी वेल वाढेल झरझर-घरात येईल समृद्

अशा पद्धतीने भिजत घाला मेहेंदी


सर्वात आधी एका भांड्यात २ कप मेहेंदी घ्या. नंतर त्यात थोडं पाणी घालून मिक्स करा, आणि त्यावर झाकण ठेवा. रात्रभर किंवा ७ ते ८ तासांसाठी तसेच ठेवा.

दुसरीकडे कढईत पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. त्यात ३ ते ४ लवंग, एक चमचा चहापत्ती, १ चमचा कलौंजी, एक चमचा मेथी दाणे आणि एक चमचा रोझमेरी घालून मिक्स करा.  पाण्याला उकळी आल्यानंतर गाळून मेहेंदीच्या मिश्रणात घाला.

वजन कमी करायचं? आहारातून तेल वगळावं की भात? नक्की काय खाणं बंद केल्यानं वजन घटतं?

नंतर मिक्सरच्या भांड्यात ४ ते ५ जास्वंदाची फुलं घालून वाटून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट मेहेंदीच्या मिश्रणात घाला. नंतर मिक्सरच्या भांड्यात आवळा, एलोवेरा जेल, कडीपत्ता घालून मिक्स करा. मिश्रण एका सुती कपड्यात काढून घ्या, व त्यातून निघालेला रस मेहेंदीच्या मिश्रणात घालून मिक्स करा.

नंतर त्यात २ चमचे भृंगराज पावडर आणि एक चमचा खोबरेल तेल घालून मिक्स करा. सर्व साहित्य एकजीव करा, केस विंचरून घ्या, आणि मेहेंदी केसांना लावा. ४ ते ५ तासानंतर केस पाण्याने धुवा. शाम्पूने धुणे टाळा. दुसऱ्या दिवशी आपण शाम्पूचा वापर करू शकता. महिन्यातून एकदा आपण अशा पद्धतीने केसांना मेहेंदी लावू शकता. यामुळे केसांची योग्य वाढ होईल. पांढरे केस काळे होतील.

Web Title: Henna/ Mehndi Hair pack to stop hairfall & get long hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.