अनेक अभ्यासात असे आढळून आले की, जास्वंद केसांसाठी फायदेशीर ठरते (Hair Growth). जास्वंदाचे फुल केसगळतीवर उत्तम उपाय असल्याचं सिद्ध झालं आहे. जास्वंदाच्या फुलामध्ये असणारे अँटीफंगल गुणधर्म हे स्काल्पवरचे जीवाणू नष्ट करतात. ज्यामुळे स्काल्प क्लिन होते. त्यामुळे केसात खाज सुटणे, केसगळती होणे यासारख्या समस्या दूर होतात.
जर आपण केस गळतीच्या समस्येने त्रस्त असाल तर, जास्वंदाच्या फुलाचा वापर शाम्पूमध्ये करून पाहा. जास्वंदाच्या फुलापासून तयार शाम्पूने केस धुतल्याने केसांना बरेच फायदे मिळतात. शिवाय केस घनदाट, काळेभोर आणि सुंदर दिसतात. पण शाम्पूमध्ये जास्वंदाच्या फुलाचा वापर कसा करावा? पाहूयात(Herbal Hibiscus shampoo For Hair Growth).
शाम्पूमध्ये जास्वंदाच्या फुलाचा वापर कसा करावा?
लागणारं साहित्य
जास्वंदाची फुलं
चहा पावडर
कॉफी
उन्हामुळे चेहरा काळवंडला? चमक हरवली? बटाट्याच्या रसात मिसळा ३ पैकी १ गोष्ट; चेहरा चमकेल..
पाणी
शाम्पू
अशा पद्धतीने तयार करा जास्वंदाचा शाम्पू
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये जास्वंदाची फुलं घ्या. त्यात एक चमचा चहा पावडर, एक चमचा कॉफी आणि एक वाटी पाणी घालून मिक्स करा. त्यावर रात्रभरासाठी झाकण ठेवा. नंतर सकाळी चहाच्या गाळणीने पाणी गाळून घ्या.
तयार पाणी एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात २ चमचा शाम्पू घालून मिक्स करा. अशा प्रकारे आपला जास्वंदाचा शाम्पू वापरण्यासाठी रेडी.
केस आधी विंचरून घ्या. तयार शाम्पू स्काल्पपासून ते केसांच्या टोकापर्यंत लावा. काही वेळानंतर पाण्याने केस धुवून घ्या. आपण या शाम्पूचे वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता.
केसांसाठी जास्वंदाच्या फुलाचे फायदे
केस वाढवण्यास मदत
दिवसभर नाही तर, झोपण्यापूर्वी घ्या केसांची 'अशी' काळजी; केस गळती थांबेल; वाढतील इतके की..
जास्वंदाची फुलं केसांच्या वाढीसाठी मदत करतात. त्यात आढळणारे अमीनो ऍसिड केसांना पोषक तत्वे पुरवतात. हे अमीनो ऍसिड केसांच्या निर्मितीमध्ये विशेष भूमिका बजावतात. विशेष म्हणजे हे फुल केराटिन नावाचे विशेष प्रकारचे स्ट्रक्चरल प्रोटीन तयार करतात. ज्यामुळे केसांची योग्य वाढ होते.
कोंड्यापासून मुक्ती
अनेक कारणामुळे केसात कोंडा, किंवा स्काल्पवर खाज सुटते. यावर उपाय म्हणून आपण जास्वंदाच्या फुलाचा वापर करू शकता. ही फुलं ऐस्ट्रिंजंट एजंट म्हणून काम करतात. जे टाळूच्या पोअर्स आणि ग्रंथींमधून बाहेर पडणारे तेल नियंत्रित करते. शिवाय पीएच पातळी योग्य राहते. ज्यामुळे कोंडा किंवा खाजेची समस्या पुन्हा उद्भवत नाही.