Join us  

हर्बल शाम्पू आणि नॅचरल बाॅडी लोशन घरीही तयार करता येतं, बघा सोपी कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 7:11 PM

बाहेरच्या शाम्पू आणि बाॅडी लोशनमध्ये केस आणि त्वचेस हानिकारक असे रासायनिक घटक असतात. म्हणूनच नैसर्गिक घटकांचा वापर करुन (homemade herbal shampoo) शाम्पू आणि लोशन (homemade natural body lotion) तयार करणं हा जास्त सुरक्षित पर्याय आहे. घरच्याघरी हर्बल शाम्पू (how to make herbal shampoo) आणि बाॅडी लोशन (how to make body lotion) करणं सोपं आहे.

ठळक मुद्देघरी तयार केलेल्या या हर्बल शाम्पूनं केस धुतल्यास केसांना चमक येते. केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि केस मऊ मुलायम होतात.घरी तयार केलेल्या या नॅचरल बाॅडी लोशनमधील नैसर्गिक घटकांमुळे त्वचेचं पोषण होतं. त्वचा माॅश्चराईज करण्याचा हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. 

केसांची आणि त्वचेची निगा राखण्यासाठी ब्यूटी प्रोडक्टसची आवश्यकता असते. पण केस आणि त्वचा ही नाजूक बाब असून त्यासाठीचे प्रोडक्टसही तितकेच विश्वसनीय आणि सुरक्षित असणं आवश्यक आहे.  बाहेरच्या शाम्पू आणि बाॅडी लोशनमध्ये केस आणि त्वचेस हानिकारक असे रासायनिक घटक असतात. म्हणूनच नैसर्गिक घटकांचा वापर करुन शाम्पू (homemade herbal shampoo) आणि लोशन (homemade natural body lotion)  तयार करणं हा जास्त सुरक्षित पर्याय आहे. घरच्याघरी हर्बल शाम्पू ( how to make herbal shampoo)  आणि बाॅडी लोशन (how to make natural body lotion)  करणं सोपं आहे. 

Image: Google

हर्बल शाम्पू कसा तयार करावा?

हर्बल शाम्पू तयार करण्यासाठी अर्धा कप शिकेकाई, 1 कप रीठे, पाव कप आवळा घ्यावा.  शाम्पू तयार करताना लोखंडाच्या कढईत शिकेकाई, रीठे आणि आवळा पाण्यात रात्रभर भिजत घालावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी हे मिश्रण उकळण्यास ठेवावं. एक उकळी आल्यानंतर गॅस मंद करुन मिश्रण 15-20 मिनिटं उकळावं. मिश्रण आटलं आणि फेस दिसू लागला की गॅस बंद करावा. मिश्रण थंडं होवू द्यावं. नंतर हे मिश्रण चांगलं कुस्करुन घ्यावं. मिश्रण गाळून एका बाटलीमध्ये भरुन ठेवावं. केस धुताना विकतच्या शाम्पू ऐवजी हे मिश्रण केस धुण्यासाठी वापरावं. घरी तयार केलेल्या या हर्बल शाम्पूनं केस धुतल्यास केसांना चमक येते. केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि केस मऊ मुलायम होतात. 

Image: Google

नॅचरल बाॅडी लोशन तयार करताना

नॅचरल बाॅडी लोशन तयार करण्यासाठी 2 चमचे ग्रीन टी, अर्धा चमचा शिया बटर, 1 चमचा मध, 1 चमचा ताजा लिंबाचा रस, 1 चमचा ई जीवनसत्व ऑईल घ्यावं. बाॅडी लोशन तयार करताना एका मोठ्या वाटीत सर्व सामग्री घेऊन ते चांगलं एकत्रित करावं. हे मिश्रण एका हवाबंद डब्यात भरुन ते फ्रिजमध्ये ठेवावं. आंघोळ झाल्यानंतर रुमालानं अंगं टिपून घेवून हे तयार केलेलं लोशन अंगास लावावं. घरी तयार केलेल्या या नॅचरल बाॅडी लोशनमुळे त्वचा माॅश्चराइज होते. त्वचेस आवश्यक असलेली आर्द्रता आणि ओलावा या लोशनमधून त्वचेस मिळते. तसेच यात असलेल्या नैसर्गिक घटकांमुळे त्वचेचं पोषणही होतं. त्यामुळे घरी तयार केलेलं हे बाॅडी लोशन वापरणं त्वचेसाठी फायदेशीर आणि सुरक्षित ठरतं.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीकेसांची काळजीहोम रेमेडी