Lokmat Sakhi >Beauty > हर्बल टी पिण्याचे 5 फायदे, प्या 5 प्रकारचे हर्बल टी - कायम तरुण दिसण्याचा सोपा उपाय

हर्बल टी पिण्याचे 5 फायदे, प्या 5 प्रकारचे हर्बल टी - कायम तरुण दिसण्याचा सोपा उपाय

कधीकधी आपल्या नेहेमीच्या सवयी आपल्याला काही फायदाही करुन देतात. चहा पिण्याची सवय त्यातलीच एक. तरुण दिसण्यासाठी (for anti ageing effect) चहा पिण्याच्या सवयीला थोडा ट्विस्ट देणं गरजेचं आहे. नेहेमीचा दूध घातलेला चहा पिण्यापेक्षा रोज सकाळी हर्बल टी (herbal tea benefits) प्याल्यास तरुण दिसण्यासोबतच आरोग्यास इतरही फायदे होतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2022 04:57 PM2022-07-22T16:57:47+5:302022-07-22T17:08:54+5:30

कधीकधी आपल्या नेहेमीच्या सवयी आपल्याला काही फायदाही करुन देतात. चहा पिण्याची सवय त्यातलीच एक. तरुण दिसण्यासाठी (for anti ageing effect) चहा पिण्याच्या सवयीला थोडा ट्विस्ट देणं गरजेचं आहे. नेहेमीचा दूध घातलेला चहा पिण्यापेक्षा रोज सकाळी हर्बल टी (herbal tea benefits) प्याल्यास तरुण दिसण्यासोबतच आरोग्यास इतरही फायदे होतात.

Herbal tea for anti ageing effect... How herbal tea benefits for beauty and health | हर्बल टी पिण्याचे 5 फायदे, प्या 5 प्रकारचे हर्बल टी - कायम तरुण दिसण्याचा सोपा उपाय

हर्बल टी पिण्याचे 5 फायदे, प्या 5 प्रकारचे हर्बल टी - कायम तरुण दिसण्याचा सोपा उपाय

Highlightsहर्बल टी मधील ॲण्टिऑक्सिडण्ट्समुळे पेशींचा दाह कमी होतो. आपल्या नेहेमीच्या चहामध्ये कॅफीनचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे शरीरात कोरडेपणा निर्माण होतो. हर्बल टीचा सौंदर्य वृध्दीसोबतच आरोग्य सुधारण्यासही फायदा होतो. 

वय होण्याआधीच चेहेऱ्यावर वय दिसू लागण्याच्या समस्येला अनेकजणींना सामोरं जावं लागतंय. वातावरणातील धूळ, प्रदूषण,ऊन यामुळे चेहेऱ्यावर (ageing problem)  एजिंगची समस्या दिसायला लागते. चेहेऱ्यावर डाग दिसायला लागतात. चेहेऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या तर खूप अस्वस्थ होवून महागड्या उपचारांच्या वाट्याला जाण्यपेक्षा घरचे उपचार करुन पाहावेत. आपल्याला रोज चहा पिण्याची सवय असतेच. प्रामुख्याने बहुतांशजण सकाळी, संध्याकाळी दूध घातलेला चहा पितात. कधीकधी आपल्या नेहेमीच्या सवयी आपल्याला काही फायदाही करुन देतात. त्यातलीच ही चहा पिण्याची सवय आहे. फक्त ॲण्टि एजिंगच्या (herbal tea for anti ageing)  फायद्यासाठी चहा पिण्याच्या सवयीला थोडा ट्विस्ट देणं गरजेचं आहे. नेहेमीचा दूध घातलेला चहा पिण्यापेक्षा रोज सकाळी हर्बल टी प्याल्यास तरुण दिसण्यासोबत आरोग्यास इतरही फायदे होतात.

Image: Google

हर्बल टी पिण्याचे फायदे

1. हर्बल टी प्यालास तरुण दिसण्यास मदत होते. कारण हर्बल टीमध्ये हर्ब्सचा म्हणजेच औषधी वनस्पतींचा उपयोग केलेला असतो. या औषधी वनस्पतींमध्ये पाॅलीफेनल, फ्लेवोनाॅइड आणि कॅटेचिन्स हे ॲण्टिऑक्सिडण्ट्स असतात. हे ॲण्टिऑक्सिडण्टस त्वचेचं सूर्याच्या अती नील किरणांपासून संरक्षण करतात. ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे पेशींचा दाह अर्थातच ऑक्सिडेशनची प्रक्रिया कमी होते. यामुळे शरीरावरील मुक्त मुलकांचा प्रभाव कमी होतो. हे मुक्त मूलक चेहेऱ्यावरील सुरकुत्यांस कारणीभूत ठरतात. त्यामुळेच हर्बल टी प्याल्यानं ॲण्टि एजिंग इफेक्ट मिळतो.

2. पचनाच्या आणि आतड्यांशी निगडित  समस्या असतील  तर हर्बल टी पिणं लाभदायक ठरतं. हर्बल टी दिवसातून दोनदा प्याल्यास पचन क्रिया सुधारते.  हर्बल टीमधील फ्लेवोनाॅइड्स आणि टर्पेनाॅइड्स हे घटक ताप, जळजळ, स्नायूदुखी, निद्राबाश यासारख्या समस्यांवर उपचार करण्यास मदत करतात. 

Image: Google

3. महिलांमध्ये वय वाढतं तसे हाडांचे, सांध्यांचे दुखणे वाढते. गुडघे दुखतात. अशा परिस्थितीत हर्बल टी पिणं लाभदायक ठरतं. रुईबोस टी सारख्या हर्बल टीमध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, तांबं, मॅगनीज, झिंक आणि मॅग्नेशियम यासारखे खनिजं असतात.  या खनिजांमुळे हाडांची घनता वाढते. हाडं मजबूत होतात. संधिवात, गाउट सारख्या समस्यांमध्ये हळदीचा चहा घेतल्यास फायदा होतो. हळदीचा हर्बल चहा रोज प्याल्यास संधिवाताचा त्रास कमी होतो. 

4. हर्बल टीमधील पाॅलीफेनाॅल्स, फायटोकेमिकल्स यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. शरीराचं संसर्गापासून संरक्षण होतं.

5. आपल्या नेहमीच्या चहामध्ये कॅफीन असतं. कॅफीन असलेला चहा जास्त प्याल्यास शरीरात कोरडेपणा निर्माण होतो. म्हणूनच नेहेमीच्या चहाच्या ऐवजी हर्बल टी प्यायला हवा. हर्बल टीमध्ये कॅफीन नसतं. कॅफीनचं सेवन कमी केल्यास मनावरचा ताण, मनातील भीती कमी होते. एका अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात की रोज टी म्हणजे गुलाबाचा चहा प्याल्यानं भीतीचा आजार असलेल्या रुग्णांना  त्यांच्या समस्येत फायदा मिळतो. 

Image: Google

हर्बल टीचे प्रकार

हर्बल टीचे वेगवेगळे प्रकार आहेत. पण आरोग्यास फायदेशीर आणि तरुण दिसण्यास मदत होतील असे चहाचे चार प्रकार आहेत. 

1. ग्रीन टी

ग्रीन टी पिणं हा एकूणच आरोग्यास फायदेशीर असतो. ग्रीन टीमधील ॲण्टिआक्सिडण्टसमुळे त्वचेचं मुक्त मुलकांपासून संरक्षण होतं. ग्रीन टी नियमित सेवन केल्यास  शरीरातील विषारी घटक बाहेर पडतत.

2. रुईबोस टी

रुईबोस टी हा तरुण दिसण्यासाठी फायदेशीर असतो. या चहामुळे चेहेऱ्यावर सुरकुत्या पडत नाही. या चहामध्ये अल्फा हाइड्राॅक्सी ॲसिड हा घटक असतो. या घटकाचा त्वचेवरील उपचारांमध्ये वापर केला जातो. 

3. ओलोंग टी

फिकट रंगाचा ओलोंग टी त्वचेसाठी खूपच फायदेशीर असतो. या चहामध्ये ॲण्टिएजिंग गुणधर्म असतात. या चहामधील ॲण्टिऑक्सिडण्ट्स त्वचा स्वच्छ होण्यास मदत करतात. यामुळे त्वचेवर सुरकुत्याही पडत नाहीत. 

Image: Google

4. माचा टी

माचा टी हा एक प्रकारचा ग्रीन टीच असून तो पावडर स्वरुपात असतो. या चहामध्ये ॲण्टिऑक्सिडण्ट्स भरपूर असतात जे चेहेऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत करतात. 

5. टर्मरिक टी

हळदीच्या चहामध्ये सूज आणि दाहविरोधी घटक, ॲण्टिऑक्सिडण्ट्स असतात. हळदीचा चहा प्याल्यानं संधिवाताचा त्रास कमी होतो. रोगप्रतिकारशक्ती वाढते. हदयाच्या रक्तवाहिन्यांशी निगडित आजार कमी होतात. कॅन्सर आणि आतड्यांशी निगडित आजारांचा धोका टळतो. अल्झायमरसारख्या आजाराचा धोका टाळण्यासाठी तसेच या आजारावरील उपचार म्हणून हळदीच्या चहाचा उपयोग होतो. 

 
 

Web Title: Herbal tea for anti ageing effect... How herbal tea benefits for beauty and health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.