निरोगी आरोग्यासाठी, वजन कमी करण्यासाठी म्हणून हर्बल चहा (herbal tea) पिण्याचा सल्ला दिला जातो. पण हर्बल चहाचा केवळ एवढाच उपयोग (herbal tea benefits) नाही. केस सुंदर आणि मजबूत करण्यासाठी (herbal tea for strong hair) हर्बल चहाचा उपयोग होतो. एरवीपेक्षा पावसाळ्यात केस गळतीची समस्या (hair fall problem) जास्त जाणवते. या दिवसात केस जास्त तेलकट होतात. केसांचं सौंदर्यही हरपतं. अशा समस्येत हर्बल चहा पिणं फायदेशीर ठरतो. हर्बल चहामुळे केस गळणं कमी होतं. केस सुंदर दिसतात. पावसाळ्याच्या दिवसात हर्बल चहा प्यायल्यानं रोग प्रतिकारशक्ती वाढते. त्वचा आणि केसांच्या संरक्षणाचे गुणधर्म हर्बल चहामध्ये (herbal tea for strong hari) असतात. हर्बल चहाचे अनेक प्रकार आहेत. त्यातले 5 प्रकारचे हर्बल चहा (types of herbal tea) केसांसाठी फायदेशीर मानले जातात.
Image: Google
1. चमेलीचा चहा
चमेलीच्या झाडाच्या पानांपासून तयार केलेला चहा फायदेशीर असतो. चमेलीच्या झाडांच्या पानांमध्ये ॲण्टिऑक्सिडण्ट्स, सूजविरोधी आणि विषाणूविरोधी गुणधर्म असतात. या गुणधर्मांमुळे हा चहा केस निरोगी ठेवण्यासाठी उत्तम असतो. हर्बल चहा तयार करण्यासाठी चमेलीची फुलं आणि पानांचा उपयोग केला जातो. या चहामुळे शरीर मनावरील ताण कमी होतो. केसांच्या मुळांना होणारा संसर्ग टळतो. केसांच्या मुळांचं पोषण होवून केस मजबूत होतात.
Image: Google
2. आल्याचा चहा
आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. आल्यातील गुणधर्मांमुळे केसांची मुळं मजबूत होतात. आल्यात क जीवनसत्व, कॅल्शियम, फाॅस्फरस, लोह, झिंक, तांबं, मॅंग्नीज आणि क्रोमियम हे घटक असतात. आल्यातील क जीवनसत्व आणि झिंक हे घटक केसांसाठी उपयुक्त असतात. यामुळे डोक्याला येणारी खाज, डोकेदुखी या समस्या दूर होतात. केसांच्या मुळाशी होणारी आग थांबते. आलं पाण्यात उकळून त्याचा चहा प्यायल्यास केसांना नैसर्गिकरित्या चमक येते.
Image: Google
3. पुदिन्याचा चहा
पुदिन्याचा चहा प्यायल्यानं छान ताजं तवानं वाटतं. या चहाचा केसांसाठीही उपयोग होतो. पुदिन्याच्या चहामधील मेन्थाॅल या घटकामुळे केसांच्या मुळांना थंडावा मिळतो. केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते. केस वाढण्यासाठी पुदिन्याचा चहा फायदेशीर ठरतो. पावसाळ्याच्या दिवसात पुदिन्याचा चहा प्यायल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते.
Image: Google
4. ग्रीन टी
वजन कमी करण्यासाठी ग्रीन टीचा उपयोग होतो. पण केसांना चमक येण्यासाठी आणि केस मजबूत करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर असतो. ग्रीन टीमध्ये ॲण्टिऑक्सिडण्ट्स, अ, ई जीवनसत्वं, प्रथिनं, लोह, तांबं हे घटक असतात, जे निरोगी केसांसाठी आवश्यक असतात. पावसाळ्याच्या दिवसात संध्याकाळी ग्रीन टी पिणं केसांसाठी फायदेशीर ठरतं.
Image: Google
5. लॅवेण्डर टी
केस निरोगी ठेवण्यासाठी लॅवेण्डर टी मदत करतो. या फुलांच्या सुंगधानं मनावरील ताण कमी ओतो. सोबतच केस मऊ मुलायम आणि चमकदार खोतात. या चहामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. रात्री शांत झोप येण्यासाठी हा चहा फायदेशीर ठरतो. लॅवेण्डर टी प्यायल्यानं जसा फायदा होतो तसाच फायदा लॅवेण्डर टीने केस धुतल्यानेही होतो. पिण्यासाठी आणि केस धुण्यासाठी लॅवेण्डर टी वापरता येतो.