Join us  

हेअर रिमूव्हलसाठी वॅक्सिंगचे चटके कशाला सहन करता? नैसर्गिक पदार्थ वापरुन नको असलेले केस काढा सहज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2024 3:42 PM

Homemade Natural Wax : Hair Removal at Home Made Easy Without Waxing : Here are some alternatives to waxing your skin : त्वचेवरील केस काढण्यासाठी आपण वॅक्स ऐवजी काही घरगुती नैसर्गिक पदार्थांचा वापर करु शकतो.

शरीरावर नको असलेले केस काढण्यासाठी वॅक्सिंग हाच उत्तम पर्याय मानला जातो. शरीरावरील अनावश्यक केस काढणे खूप वेदनादायक आणि वेळखाऊ काम असते. वॅक्सिंग, शेव्हिंग आणि थ्रेडिंग हे शरीरावरील केस काढण्याचे सर्वात कॉमन उपाय आहेत. शरीरावरील अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी वॅक्सिंग (Hair Removal Getting Painful? Here Are Some Alternatives To Waxing) परवडणारी आणि सुरक्षित पद्धत मानली जाते. हे शेव्हिंगच्या तुलनेत जास्त काळ टिकते. सॉफ्ट वॅक्स, हार्ड वॅक्स, फ्रूट वॅक्स, चॉकलेट वॅक्स आणि शुगर वॅक्स असे वॅक्सिंगचे अनेक प्रकार आहेत(If you’re tired of waxing, here are one simple alternative hair-removal method). 

सर्वांच्याच चेहऱ्यावर आणि शरीरावर काही ठिकाणी पातळ तर काही ठिकाणी जाड केस असतात. पण काहीजणींना शरीरावरील आणि चेहऱ्यावरील केस आवडत नाहीत. हे केस काढण्यासाठी वॅक्सिंग (Waxing) किंवा थ्रेडिंगची (Threading) मदत घेतली जाते. पण वॅक्सिंग किंवा थ्रेडिंगमुळे त्वचेवर पुरळ उठणं, जळजळ होणं यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. या त्रासांपासून वाचण्यासाठी तुम्ही शरीरावरील अनावश्यक केस काढण्याच्या घरगुती टिप्सचा (hair removal tips) वापर करू शकता. नको असलेले केस काढण्यासाठीचे हे घरगुती उपाय त्वचेला चमकदार देखील बनवण्यास मदत करतील. त्वचेवरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी आपल्याला गरम वॅक्सचे चटके सोसायची गरज नाही. केस काढण्यासाठी आपण वॅक्स ऐवजी काही घरगुती नैसर्गिक पदार्थांचा वापर करु शकतो. हे नैसर्गिक पदार्थ वापरुन अगदी सहजरित्या घरच्या घरी कुठल्याही वेदनेशिवाय वॅक्सिंग करु शकता(Best home wax or wax-alternative for hair removal).

वॅक्सिंगचा वापर न करता घरच्या घरी नॅचरल वॅक्स कसे करावे ? 

साहित्य :- 

१. पाणी - १/२ कप२. साखर - १/२ टेबलस्पून ३. एलोवेरा जेल - १ टेबलस्पून ४. हळद - चिमूटभर ५. खोबरेल तेल - १ टेबलस्पून ६. गव्हाचे पीठ - २ टेबलस्पून ७. तांदुळाचे पीठ - १ टेबलस्पून 

काळवंडलेली त्वचा उजळेल लख्ख, ‘हा’ होममेड टॅनिंग मास्क वापरा-हातापायाचे टॅनिंग गायब...

प्रियांका चोप्रा सांगते तिच्या गुलाबी ओठांचं सिक्रेट- होममेड लिप स्क्रबचा अनोखा उपाय, खुलते सौंदर्य...

कृती :- 

१. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात साखर, हळद, एलोवेरा जेल, खोबरेल तेल घालून हे सगळे जिन्नस पाण्यांत व्यवस्थित मिक्स करून घ्यावेत. २. हे भांड्यातील मिश्रण किमान २ ते ४ मिनिटे गॅसच्या मंद आचेवर ठेवून गरम करुन घ्यावे. ३. त्यानंतर गॅस बंद करून हे मिश्रण गाळून एका वेगळ्या भांड्यात ओतून थंड होण्यासाठी तसेच ठेवून द्यावे. ४. हे मिश्रण थंड झाले की त्यात गव्हाचे व तांदुळाचे पीठ, खोबरेल तेल घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यावेत. ५. ही पेस्ट तयार करताना ती चमच्याने नीट हलवून घ्यावी यात पिठाच्या गुठळ्या राहिल्या नाहीत याची खात्री करुन घ्यावी.  आता हे मिश्रण आपल्या त्वचेवर वापरण्यासाठी तयार आहे. 

नेल आर्ट-मॅनिक्युअर करण्याची गरज नाही, सुंदर नखांसाठी फक्त खाण्यात ‘हे’ सोपे बदल करा...

शोभितासारखा ग्लो हवा चेहऱ्यावर? पाहा तिचे सोपे सिक्रेट - एकदा लावा चेहऱ्यावर येईल चमक...

या पेस्टचा वापर त्वचेवर नेमका कसा करावा ?

१. ज्या भागावरील अनावश्यक केस आपल्याला काढून टाकायचे आहेत. त्या भागावर या पेस्टच्या एकदम पातळ लेअर द्यावा. २. त्वचेवरील ज्या भागातील केस काढायचे आहेत त्या भागावर ही पेस्ट लावून घ्यावी. ३. त्यानंतर त्वचेवर लावलेली ही पेस्ट हलकीशी सुकू द्यावी. संपूर्णपणे सुकू देऊ नये हाताला किंचित ओलसर लागेल अशी झाल्यावर हातावर खोबरेल तेल घेऊन ते केस ज्या दिशेने उगवले आहेत त्याच्या विरुद्ध दिशेने खोबरेल तेल लावत मसाज करुन घ्यावा. ४. अशाप्रकारे या सोप्या ट्रिकचा वापर केल्यास आपण वॉक्सचा वापर न करता अगदी सहज नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन त्वचेवरील अनावश्यक केस काढू शकता.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी