Lokmat Sakhi >Beauty > रोज सकाळी फक्त थंड पाण्याने चेहरा धुवा, दिसतील ४ सुंदर फरक, चिरकाळ टिकून राहील तारुण्य

रोज सकाळी फक्त थंड पाण्याने चेहरा धुवा, दिसतील ४ सुंदर फरक, चिरकाळ टिकून राहील तारुण्य

Here are the benefits of washing your face with cold water : महागडे केमिकल प्रॉडक्ट्स, पार्लरमधला खर्च टाळायचं असेल तर, घरीच थंड पाण्याने चेहरा धुवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2023 12:45 PM2023-11-21T12:45:52+5:302023-11-21T12:46:29+5:30

Here are the benefits of washing your face with cold water : महागडे केमिकल प्रॉडक्ट्स, पार्लरमधला खर्च टाळायचं असेल तर, घरीच थंड पाण्याने चेहरा धुवा..

Here are the benefits of washing your face with cold water | रोज सकाळी फक्त थंड पाण्याने चेहरा धुवा, दिसतील ४ सुंदर फरक, चिरकाळ टिकून राहील तारुण्य

रोज सकाळी फक्त थंड पाण्याने चेहरा धुवा, दिसतील ४ सुंदर फरक, चिरकाळ टिकून राहील तारुण्य

प्रत्येकासाठी चेहरा (Skin Care) महत्वाचा असतो. चेहऱ्याची निगा राखण्यासाठी बरेच जण विविध उपाय करून पाहतात. मात्र, वयानुसार चेहऱ्यामध्ये देखील विशेष बदल घडतात. मुरूम, काळे डाग, पिग्मेण्टेशन यासह विविध समस्यांमुळे चेहरा अधिक खराब दिसू लागतो. अशा वेळी आपण चेहऱ्यावर विविध सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतो. शिवाय पार्लरमध्येही खर्च करतो. पण महागडे केमिकल प्रॉडक्ट्स, पार्लरमधला खर्च टाळायचं असेल तर, घरीच थंड पाण्याने चेहरा धुवा.

आता तुम्ही म्हणाल फक्त थंड पाण्याने चेहरा (Cold Water) धुतल्याने स्किनवर ग्लो येऊ शकेल का? तर याचं उत्तर आहे हो, सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुण्याचे अनेक फायदे आहेत. नियमित चेहरा थंड पाण्याने धुतल्याने खरंच फरक पडतो का? चेहरा थंड पाण्याने कधी आणि कसे धुवावे? पाहा(Here are the benefits of washing your face with cold water).

चेहरा थंड पाण्याने धुवायचे फायदे

चेहऱ्यावरील सूज होईल कमी

रात्रभर चेहऱ्यावर तेल साचते. सकाळी उठल्यानंतर चेहरा तेलकट दिसतो, शिवाय अनेकांचा चेहरा सुजलेला दिसतो. कारण त्वचेवरी रोमछिद्र थोडी मोठी होतात, ज्यामुळे आपला चेहरा सुजलेला दिसतो. अशा वेळी आपण सकाळी चेहरा थंड पाण्याने धुवू शकता. सकाळी थंड पाण्याने चेहरा धुतल्याने फ्रेश वाटते.

मान-चेहरा-पाठीवरील चामखीळामुळे हैराण झालात? ४ घरगुती सोपे उपाय, काही दिवसात-न दुखवता निघेल चामखीळ

त्वचा दिसते तरुण

नियमित थंड पाण्याने चेहरा धुतल्याने आपली त्वचा तरुण दिसते. जेव्हा आपण चेहऱ्यावर बर्फाचा  क्यूब घासतो, तेव्हा स्किन टाईट होते. ज्यामुळे आपली सैल झालेली स्किन ग्लो करते. थंड पाणी एक उत्कृष्ट अँटी रिंकल क्रीमसारखे कार्य करते. ज्यामुळे फाईन लाईन्स, सुरकुत्याही कमी होतात.

नैसर्गिक ग्लो

सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुतल्याने, ब्लड सर्क्युलेशन सुधारते. ज्यामुळे स्किनवर नैसर्गिक ग्लो तर येतोच, शिवाय हा ग्लो दिवसभर टिकून राहतो.

डार्क सर्कलमुळे सतत मेकअप करावा लागतो? ३ घरगुती उपाय, मेकअप न करताही दिसाल सुंदर

सन डॅमेजपासून करते संरक्षण

सनस्क्रीन व्यतिरिक्त, जर आपल्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवायचे असेल तर, थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे स्किनवर सूर्याच्या अतिनील किरणांचा दुष्परिणाम होत नाही. 

Web Title: Here are the benefits of washing your face with cold water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.