Join us

अर्ध्या लिंबूने सहज निघेल पायाचे टॅनिंग, फक्त लिंबाला ३ गोष्टी लावून रगडा, पाहा चमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2024 14:06 IST

Here's how lemon helps in removing skin tanning : टॅनिंग घालवण्यासाठी ब्यूटी पार्लरचा खर्च कशाला? फक्त लिंबाच्या वापरानेही टॅनिंग निघू शकते..

अनेकदा आपण चेहऱ्याची योग्य काळजी घेतो. पण हात आणि पायांकडे आपले दुर्लक्ष होते (Beauty Tips). ज्यामुळे हाता-पायांचे टॅनिंग दूर करण्यात बरेच कष्ट घ्यावे लागतात (Summer Special). उन्हाळ्यात आपली स्किन टॅन होणे कॉमन आहे (Tanning Removal). पण हे टॅनिंग योग्य वेळेत काढणं गरजेचं आहे. टॅनिंग काढण्यासाठी आपण ब्यूटी पार्लरला जाऊन भेट देतो.

टॅनिंग काढण्यासाठी ब्यूटी पार्लरमध्ये केमिकल उत्पादनांचा वापर होतो. ज्यामुळे स्किन आणखीन खराब होते. टॅनिंग घालवण्यासाठी ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन खर्च करण्यापेक्षा, आपण घरातच टॅनिंग काढू शकता. यासाठी आपल्याला लिंबू आणि काही साहित्यांची गरज आहे. यामुळे टॅनिंग दूर होईल, शिवाय डेड स्किनही निघेल. पण अर्ध्या लिंबाचा वापर टॅनिंग दूर करण्यासाठी कसा करावा? पाहा(Here's how lemon helps in removing skin tanning).

टॅनिंग घालवण्यासाठी अर्ध्या लिंबाचा करा असा वापर

ओपन पोर्स कमीच होतं नाही, चेहऱ्यावर छिद्रं दिसतात? 'या' मातीत मिसळा २ गोष्टी; पाहा बदल

सर्वप्रथम, पाय स्वच्छ धुवून घ्या. नंतर मोठा अर्धा लिंबू घ्या. त्यावर छोटा चमचा साखर, चिमुटभर बेकिंग सोडा, अर्धा छोटा चमचा मध, अर्धा छोटा चमचा एलोवेरा जेल घालून मिक्स करा. नंतर मिश्रणासह लिंबू पायावर घासा. आपण याने पाय आणि हातावरचे टॅनिंग काढू शकता. १० मिनिटानंतर पाण्याने हात आणि पाय स्वच्छ धुवून घ्या. आपण या होममेड रेमेडीचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. जेणेकरून टॅनिंग लवकरात लवकर निघेल.

टॅनिंग घालवण्यासाठी लिंबू आणि बटाट्याचा वापर

लिंबू आणि बटाटा दोन्ही ब्लिचिंग एजंट आहेत. आपण या दोन्हींच्या वापराने टॅनिंग घालवू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये एक बटाटा किसून त्याचा रस काढा. त्यात एक चमचा लिंबाचा रस मिक्स करा, आणि गुलाब पाणी घाला. चांगले मिक्स करा. कॉटन पॅडच्या मदतीने हे मिश्रण हातावर आणि पायावर लावा. काही मिनिटे असेच ठेवा नंतर पाण्याने धुवा. या दोन्ही गोष्टींमुळे टॅनिंग सहज निघेल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी