Join us  

चमचाभर शाम्पूत मिसळा १ चमचा हळद, हा सोपा उपाय करा - केस गळतीवर सापडेल उत्तम उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2023 12:16 PM

Here's How Turmeric with shampoo Can Help Battle Dandruff And Hair Loss : गळत्या केसांमुळे आणखीन टेन्शन घेऊ नका, फक्त केस धुताना शाम्पूमध्ये चिमुटभर हळद मिसळा, मग बघा कमाल..

हळदीचा (Turmeric) वापर प्रत्येक भारतीय किचनमध्ये होतो. हळद फक्त जेवणाची चव किंवा पदार्थाचा रंग वाढवत नसून, याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. शिवाय याचा वापर केस आणि त्वचेसाठीही केला जातो. केसांना लांब आणि घनदाट करण्यासाठी आपण हळदीचा (Turmeric for hair growth) वापर करू शकता. पण याचा वापर केसांसाठी कसा करावा? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

एनसीबीआयवर प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, हळदीमध्ये असलेले गुणधर्म केसांसाठी टॉनिकसारखे काम करते. हे स्काल्पच्या सोरायसिसवर काम करते. ज्यामुळे केसांची योग्य वाढ होते. हळदीचा वापर केसांसाठी केल्याने केसात कोंडा, केस पांढरे होणे, केस गळतीची (Hair care tips) समस्या सुटते(Here's How Turmeric with shampoo Can Help Battle Dandruff And Hair Loss).

केसांसाठी उपयुक्त हळदीतील गुणधर्म

हळदीत अनेक गुणधर्म असतात. त्यातील अँटी-सेप्टिक, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे केसांच्या अनेक समस्या सुटतात. हळदीमध्ये उपस्थित कर्क्युमिन नावाच्या संयुगात अँटीऑक्सिडेंट असतात. यामुळे केस लवकर पांढरे होत नाहीत, शिवाय केस गळण्याची समस्याही कमी होते.

कंगवा फिरवताच फरशीवर केसच केस..खोबरेल तेलात मिसळा ५ रुपयाची १ गोष्ट, केस होतील घनदाट-सुंदर

केसांवर हळदीचा वापर कसा करावा?

शाम्पू आणि हळद

हिवाळ्यात केस गळतीची समस्या वाढते. जर आपण देखील हेअर फॉलच्या समस्येने त्रस्त असाल तर, केस धुताना शाम्पूमध्ये चिमुटभर हळद मिसळा. यासाठी एक टेबलस्पून शाम्पूमध्ये अर्धा चमचा हळद मिसळा. त्यांनतर शाम्पू स्काल्पवर लावून मसाज करा. त्यानंतर केस पाण्याने धुवून घ्या. केस धुताना गरम पाण्याचा वापर टाळा. कोमट किंवा थंड पाण्याने केस धुवा.

चेहऱ्यावर खूप केस आहेत? करून पाहा ५ रुपयांच्या तुरटीचा १ सोपा उपाय, काही मिनिटांत त्वचा उजळेल

खोबरेल तेल आणि हळद

खोबरेल तेल केसांसाठी फायदेशीर ठरते. खोबरेल तेलामध्ये लॉरिक अॅसिडसह संतृप्त चरबी असते. ज्यामुळे केसांना पोषण मिळते. शिवाय केसांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी प्रभावी ठरते. यासाठी एका वाटीत आपल्या केसांच्या लांबीनुसार तेल घ्या. तेल कोमट झाल्यानंतर त्यात हळद मिक्स करा. तयार तेल केसांच्या मुळांवर लावून मसाज करा. ३० मिनिटानंतर केस शाम्पूने धुवा.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स