Join us  

आंघोळीच्या पाण्यांत घाला या पदार्थाचे ३ ते ४ जादुई थेंब, त्वचेत दिसेल इतका सुंदर फरक की...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2023 6:22 PM

Benefits Of Adding Lemon To Bath Water : अनेक स्किन प्रॉब्लेमसाठी अत्यंत सोपा- मस्त उपाय...

सकाळी आंघोळ केल्याने आपल्याला दिवसभर फ्रेश, ताजेतवाने वाटते. आंघोळ करण्यासाठी आपण साबणाचा वापर तर न चुकता करतोच. साबणाबरोबरच आपण इतर काही अशा नैसर्गिक गोष्टींचा देखील वापर करण्याला प्राधान्य देतो. कडुलिंबाचा पाला, मीठ, गुलाबपाणी, हळद, इतर फळांच्या सुकलेल्या साली यांसारख्या गोष्टी आंघोळीच्या पाण्यांत मिसळून आपण आंघोळ करतो. यापैकीच एक म्हणजे लिंबाचा रस. आंघोळीच्या पाण्यांत लिंबाच्या रसाचे काही थेंब घालून आंघोळ केल्यास त्याचे अनेक चांगले फायदे आपल्या शरीराला मिळतात(Benefits Of Adding Lemon To Bath Water).

रोजच्या जेवणात आपण लिंबाची छोटीशी फोड आवर्जून घेतो. पोटासंबंधित जर काही विकार झाले असतील तर लिंबाचा रस पितो. शरीर आतून डिटॉक्स करण्यासाठी, चेहऱ्याची स्वच्छता करण्यासाठी फेसपॅक मध्ये लिंबाचा रसाचा वापर केला जातो. आपल्या आहारात व इतर समस्यांवर लिंबाच्या रसाचा (This one thing mixed with bathwater will make the skin glowing) वापर केल्यास त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात. यासोबतच आपण रोजच्या आंघोळीच्या पाण्यांत देखील लिंबाच्या रसाचा (Multiple benefits of  bath with Lemon) वापर नक्कीच करु शकता. आंघोळीच्या पाण्यांत लिंबाच्या रसाचा वापर केल्याने आपल्याला त्याचे कोणते फायदे होतात, ते पाहूयात(Take A Bath By Squeezing Half A Lemon In Water, The Results Will Surprise You).

आंघोळीच्या पाण्यांत लिंबाचा रस घातल्याने होणारे फायदे... 

१. जर आपली त्वचा तेलकट असेल आणि आपण त्यावर अनेक उपाय करून कंटाळलात असाल तर, रोज अंघोळीच्या पाण्यांत २ ते ३ टेबलस्पून लिंबाचा रस घालून त्या पाण्याने आंघोळ करावी. कायम आठवडाभर हा उपाय केल्यास त्वचेचा तेलकटपणा दूर करण्यास मदत मिळते. 

२. पाण्यामध्ये लिंबाचा रस घालून आंघोळ केल्यास शारीरिक थकवा दूर होऊन दिवसभर फ्रेश, ताजेतवाने राहण्यास मदत होते. 

चेहऱ्याला बर्फाने मसाज करता ? पण ४ गोष्टी चुकल्या तर चेहरा दिसतो विद्रूप - त्वचा होते खराब...

३. काहीजणांच्या शरीरांतून कायमचा घामाचा दुर्गंध येतो. सतत येणारा हा घामाचा दुर्गंध यामुळे चारचौघात आपल्याला ओशाळल्यासारखे वाटते. लिंबाच्या रसात अ‍ॅसिडिक तत्व असतात यासोबतच अँटीसेप्टिक गुणधर्मही असतात. लिंबाच्या रसाचा नियमित वापर केल्याने शरीरातून येणारी ही घामाची दुर्गंधी कमी करण्यास मदत होते. 

४. लिंबामध्ये असणारे सायट्रिक अ‍ॅसिड त्वचेवर एखाद्या ब्लीचप्रमाणे काम करते. त्यामुळे त्वचेवरील मुरुम, पुटकुळ्यांचे काळे डाग कायमचे निघून जाण्यास मदत मिळते व त्वचा चमकदार होते. 

मेकअप किटमधील कॉम्पॅक्ट पावडर फुटून त्याचा भुगा झाला ? १ सोपी ट्रिक, कॉम्पॅक्ट पावडर अशी करा सेट...

५. लिंबाचा रस आंघोळीच्या पाण्यांत घालूंन आंघोळ केल्याने त्वचेवरील वाढत्या वयाच्या म्हणजेच एजिंगच्या खुणा किंवा बारीक सुरकुत्या कमी करण्यास मदत होते. 

६. लिंबामध्ये व्हिटॅमिन 'सी' चे प्रमाण हे अधिक असते. त्यामुळे याच्या वापराने त्वचेसंबंधीच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. केमिकल्सयुक्त साबणाचा वापर करण्याऐवजी आपण जर आंघोळीच्या पाण्यांत लिंबाचा रस घालून त्याने आंघोळ केल्यास त्वचा अधिक सुंदर होण्यास मदत मिळते.

सततच्या केस गळतीने हताश झालात ? करा सोपा ‘पोटली मसाज’, केस गळणं थांबेल लवकर...

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी