त्वचेवरील जास्तीचे केस काढून टाकण्यासाठी आपण थ्रेडींग, वॅक्सिंग असे अनेक पर्याय निवडतो. आपल्यापैकी बहुतेक स्त्रिया दर महिन्याला आपल्या काही अवयवांवरील अनावश्यक केस काढून टाकतात. यामध्ये आयब्रो, हाता - पायांचे वॅक्सिंग, अंडरआर्म्स, अप्पर लिप्स यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. शरीरावरील हे अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी आपण थ्रेडींग, वॅक्सिंग, शेव्हिंग अशा अनेक पर्यायांचा वापर करतो(How To Get Rid Of The Post-Waxing Rash?).
हात - पाय सुंदर आणि मुलायम दिसण्यासाठी बऱ्याच महिला नियमित व्हॅक्सिंग करत असतात. व्हॅक्सिंगमध्ये देखील विविध प्रकार असतात. जसे की, हॉट व्हॅक्स, कोल्ड व्हॅक्स, चॉकलेट व्हॅक्स आणि असे बरेच काही प्रकार (How to Treat and Prevent Bumps After Waxing) आहेत. शरीरावर येणारे नैर्सगिक केस काढताना प्रचंड वेदना (How To Treat Post-Waxing Rashes On Skin?) तर होतातच. याशिवाय सेंन्सेटिव्ह स्किन असणाऱ्यांना व्हॅक्सिंगमुळे अधिक त्रास सहन करावा लागतो. अनेकांना व्हक्सिंग केल्यानंतर त्वचेवर बारीक पुरळ येणे, त्वचा लालसर होणे, खाज येणे अशा समस्या (4 WAYS TO GET RID OF AFTER-WAX BUMPS ON THE SKIN) उद्धभवतात. जर आपण देखील या समस्यांपासून त्रस्त असाल तर, आपण व्हॅक्सिंगनंतर त्वचेच्या होणाऱ्या या त्रासापासून त्वचेचा बचाव करु शकतो. यासाठी व्हॅक्सिंग केल्यानंतर आपण काही गोष्टींची काळजी घेतली तर आपल्या त्वचेला व्हॅक्सिंगनंतर होणारा त्रास किंवा वेदना आपण टाळू शकतो. व्हॅक्सिंग केल्यानंतर काही गोष्टींची विशेष (3 Most Common Waxing Mistakes) काळजी घेतली पाहिजे. या गोष्टींची काळजी न घेतल्यास आपली त्वचा खराब होऊ शकते, यासाठीच व्हॅक्सिंग केल्यानंतर आपण नेमकी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते पाहूयात(Avoiding Post - Wax Common Mistakes & How to Fix Them).
व्हॅक्सिंग केल्यानंतर या ३ चुका करु नका...
चूक १ :- व्हॅक्सिंग केल्यानंतर गरम किंवा कोमट पाण्याने आंघोळ करणे.
व्हॅक्सिंग केल्यानंतर आपण बहुतेकवेळा स्किन स्वच्छ करण्यासाठी आंघोळ करतो. परंतु आंघोळ करताना जरा तुम्ही गरम किंवा कोमट पाण्याचा वापर करत असाल तर आपल्या त्वचेला इजा होऊ शकते. व्हॅक्सिंग केल्यानंतर गरम किंवा कोमट पाण्याने आंघोळ करणे टाळा. शक्यतो जर व्हॅक्सिंग केल्यानंतर तुम्हांला आंघोळ करायची असेल तर थंड पाण्याचा वापर करावा. व्हॅक्सिंगनंतर गरम किंवा कोमट पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेला इजा होऊ शकते आणि त्वचा काळी पडू शकते.
जान्हवी कपूर सांगते, आईने तिला शिकवलेला खास उपाय! चेहऱ्यावर श्रीदेवीसारखा ग्लो हवा तर..
चूक २ :- व्हॅक्सिंग केल्यानंतर थेट सूर्यप्रकाशात जाणे.
व्हॅक्सिंग केल्यानंतर थंड पाण्याने आंघोळ करावी, उन्हात जाणेही टाळावे. व्हॅक्सिंग केल्यानंतर उन्हात गेल्यास थेट सूर्यप्रकाश त्वचेवर पडल्याने त्वचा काळी पडू शकते. त्याचबरोबर सूर्यप्रकाशामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्याही उद्भवू शकतात. जर तुम्हाला जाणे आवश्यकच असेल तर उन्हात जाताना सनस्क्रीनचा वापर करु शकता.
चूक ३ :- त्वचेवर मॉइश्चरायझर न लावणे.
व्हॅक्सिंग करताना पावडरचा वापर करावा, मॉइश्चरायझरही वापरावे. व्हॅक्सिंग नंतर त्वचेवर मॉइश्चरायझर न लावल्याने पुरळ येऊ शकते किंवा त्वचा लाल पडू शकते. या नुकसानापासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी व्हॅक्सिंगनंतर त्वचेला नक्कीच मॉइश्चराइज करा.
१ चमचा अळशी - १ चमचा तांदुळाचे पीठ, उपाय साधा- चेहऱ्यावरून तुमचं वय ओळखता येणार नाही...