Join us

हाय रे तेरा घागरा! बेस्ट फ्रेंडच्या लग्नात सारा अली खानने घातला 70 हजारांचा घागरा, काय त्याची खासियत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2021 17:28 IST

पतौडी घराण्याची राजकुमारी सारा अली खानचा मनमोहक लूक एकदा पाहाच...पाच-सात नाही तर तब्बल ७० हजारांच्या घागऱ्यातील पारंपरिक वेशभूषा साराचे सौंदर्य आणखी खुलवते.

ठळक मुद्देपतौडी घराण्याची राजकुमारी पारंपरिक रुपात अतिशय लोभस दिसत आहेमैत्रिणीच्या मेहंदीच्या निमित्ताने केले फोटोशूट

मित्र-मैत्रीणीचे लग्न असेल की आपण खूप एक्सायटेड असतो. त्याच्या किंवा तिच्या लग्नात मी हे करणार, ते करणार असे प्लॅन्स करत असतो. मिरवण्यासाठी ‘यार की शादी’ हे एक निमित्तच असते. मग या लग्नात मैत्रीणीच्या पुढे-मागे फिरताना आपणही भाव खाऊन जातो. पण हा भाव खाण्यासाठी प्रत्येक समारंभाला काय घालावे हे आपल्याला अनेकदा सुचत नाही. मग ही साडी नेसू की तो ड्रेस घालू असे करत ऐनवेळी आपली धांदल उडालेली दिसते. मग ऐनवेळी जे सुचेल ते घालून मोकळे होतो. पण अभिनेत्री सारा अली खान मात्र तिच्या बेस्ट फ्रेंडच्या मेहंदीसाठी खूप सुंदर तयार झाल्याचे दिसत आहे. फॅशनच्या बाबतीत कायमच अपडेटेड असलेल्या साराचे काही फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. यामध्ये साराने एक पिवळ्याा कलरचा अतिशय सुंदर असा लेहंगा घातल्याचे दिसून येत आहे. 

विशेष म्हणजे हा घागरा थोड्याथोडक्या नाही तर तब्बल ७० हजार रुपये किमतीचा आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर अर्पिता मेहता हिने या घागऱ्याचे डिझाइन केले असून फॅशन स्टायलिस्ट तन्या घावरी हिने साराचा लूक केला आहे. मेहंदीच्या निमित्ताने साराने एक फोटोसूट केले आहे. या घागऱ्याच्या ब्लाऊजचे वर्क पूर्णपणे हाताने केले असून त्याला आरशांची डिझाइनही करण्यात आली आहे. सिल्व्हर दोऱ्याने अतिशय नाजूक आणि सुरेख असे हे नक्षीकाम ब्लाऊजवर करण्यात आले आहे. अर्पिताने साराचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या लूकमध्ये साराने अजिबात जास्त मेकअप केला नसल्याचे आपल्याला दिसते. गुलाबी लिपस्टीक, गालावर थोडा ब्लश, काजळ आणि मस्कारा लावून तिने आपला पारंपरिक लूक केला आहे. तसेच तिने फारसे दागिनेही घातले नसून एक खड्यांची नाजूक अंगठी आणि कानातले इतकेच घातले आहे. पिवळ्या रंगाच्या या लेहंग्यावर आंब्याची पाने आहेत. तसेच या घागऱ्यावर त्याच कापडाचे वेगळ्या प्रकारचे जॅकेट देण्यात आले आहे. या जॅकेटचा लूक काहीसा ओढणीसारखा असला तरी ती ओढणी नसल्याचे नीट पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल. 

सारा अली खाने नेहमीच सगळ्या प्रकारच्या आऊटफिटसमध्ये भाव खाऊन जाते. त्यामुळे दिवाळीच्या दृष्टीने तुम्ही जर कपडे घ्यायचा प्लॅन करत असाल तर अशा प्रकारचा एखादा घागरा तुम्ही नक्की घेऊ शकता. प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांची लेक म्हणजे सारा अली खान. आई आणि वडील या दोघांचंही सौंदर्य सारामध्ये पुरेपुर उतरलं आहे. त्यामुळे पतौडी घराण्याची राजकुमारी असणारी सारा दिसायला अतिशय लोभस आहे, तिच्यावर हा पिवळ्या रंगाचा घागरा अतिशय उठून दिसत आहे. साराच्या सर्व इन्स्टाग्राम पोस्ट नेहेमी चर्चेत असतात. या पोस्टमधून ती सतत फिटनेसबद्दल बोलत असते. सारासाठी फिटनेस हा आनंदी जगण्याचा मंत्र असून त्याद्वारे ती तिच्या चाहत्यांना फिटनेसबाबत प्रोत्साहन देत असते.  

टॅग्स :ब्यूटी टिप्ससारा अली खानसारा खान