जास्वंदीचे फुल हे पूजेसाठी वापरले जाते, त्यामुळे पूजेच्या थाळीपासून ते स्किन व केसांची योग्य निगा राखण्यासाठी देखील या फुलांचा वापर केला जातो. प्रथिने, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसोबतच इतर जीवनसत्त्वे जास्वंदीच्या फुलात फार मोठ्या प्रमाणात असतात. केसांच्या आरोग्यासोबतच आजकाल वेगवेगळ्या स्किनच्या ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये देखील जास्वंदीच्या फुलांचा आणि पानांचा वापर अगदी सर्रास केला जातो. जास्वंदीच्या फुलामध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात ते त्वचेचे संरक्षण करतात(Hibiscus Benefits for Skin: One Flower, Every Solution).
जास्वंदीचे फुल (EFFECTIVE WAYS TO USE HIBISCUS TO GET GLASS GLOW SKIN) त्वचा निरोगी ठेवून आपल्या सौंदर्यात अधिकच भर पाडते. जास्वंदीच्या फुलांचा वापर फार पूर्वीपासून त्वचेच्या अनेक समस्या दूर ठेवण्यासाठी केला जात आहे. त्वचेच्या अनेक समस्यांपैकी एक मोठी समस्या म्हणजे त्वचेवरील काळे डाग. आपल्या त्वचेवर जर पिंपल्स, मुरुम, पुटकुळ्या येऊन गेल्या तर त्याचे काळे डाग हे आपल्या त्वचेवर कायम राहतात. हे काळे डाग आपल्या त्वचेचे सौंदर्य बिघडवतात. या काळ्या डागांमुळे आपली त्वचा अधिकच खराब दिसते. हे काळे डाग घालवण्यासाठी आपण वेगवेगळे महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरतो. परंतु या ब्यूटी प्रॉडक्ट्सने हे डाग तात्पुरते कमी होतात व पुन्हा थोड्या दिवसांनी दिसू लागतात. यासाठीच हे काळे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय करताना आपण अंगणातील जास्वंदीच्या फुलांचा वापर करु शकतो. त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी जास्वंदीच्या फुलांचा वापर कसा करावा ते पाहूयात( Hibiscus Benefits For Skin And Its Uses).
त्वचेसाठी जास्वंदीच्या फुलांचे नैसर्गिक फायदे...
१. नॅचरल एक्सफोलिएशन :- जास्वंदीच्या फुलांमध्ये नॅचरल अॅसिड असतात जे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करतात. ही नैसर्गिक एक्सफोलिएशन प्रक्रिया त्वचेवरील मुरुम, पिंपल्स, पुटकुळ्यांचे काळे डाग कमी करण्यासाठी आणि त्वचेला चमकदार बनविण्यास मदत करते.
२. त्वचेवरील काळ्या डागांसाठी :- जास्वंदीच्या फुलांमध्ये अँटिऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात जे त्वचेच्या पेशींना रॅडिकल्सपासून वाचवतात. हे अँटिऑक्सिडंट त्वचेवरील काळे गडद डाग हलके करण्यास आणि नवीन डाग तयार होण्यापासून रोखण्यास मदत करतात.
रोज काजळ लावताना ‘ही’ नेहमीची चूक करु नका, डोळ्यांवर होतात गंभीर परिणाम, सुंदर दिसणं तर दूरच..
३. त्वचेचा टोन सुधारण्यास फायदेशीर :- जास्वंदीच्या फुलामध्ये व्हिटॅमिन 'सी' मोठ्या प्रमाणात असते. जे आपल्या त्वचेचा टोन एकसमान करण्यास फायदेशीर ठरते. त्याचबरोबर या व्हिटॅमिन 'सी' मुळे त्वचेचा रंग उजळून येण्यास मदत मिळते तसेच त्वचेवरील मुरूम, पिंपल्सचे काळे डाग सहजपणे कमी केले जातात. यामुळे आपल्या त्वचेचा रंग एकसमान आणि चमकदार दिसतो.
त्वचेवरील डार्क स्पॉट्स कमी करण्यासाठी जास्वंदीच्या फुलांचा वापर कसा करावा ?
१. जास्वंदीचे फुल आणि गुलाबपाणी यांचे टोनर :- जास्वंदीचे फुल आणि गुलाबपाणी यांचा वापर करुन आपण त्वचेसाठी उत्तम प्रकारचे टोनर अगदी सहजपणे तयार करु शकता. या टोनरचा वापर करुन आपण त्वचेवरील डार्क स्पॉट्स झटपट कमी करु शकतो. जास्वंदीची फुले पाण्यांत घालून उकळवा त्यानंतर त्या फुलांचा रस काढा आणि तो थंड करा. मग त्यात समान प्रमाणात गुलाबपाणी मिक्स करा आणि स्प्रे बाटलीत स्टोअर करुन ठेवा. हे टोनर आपण दिवसातून दोनवेळा सकाळी आणि रात्री स्वच्छ चेहऱ्यावर स्प्रे करावे. या टोनरमधील गुलाबपाणी त्वचेला ताजेपणा आणि आर्द्रता मिळवून देते तर जास्वंदच्या फुलांचा अर्क त्वचेचा रंग उजळवण्यास मदत करतात.
२. जास्वंदीचे फुल आणि दही यांचा फेसमास्क :- दह्यामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड त्वचेला खोलवर स्वच्छ करते. जास्वंदीचे फुल आणि दही यांचा एकत्रित फेसमास्क त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करते. यासाठी जास्वंदीची फुले आणि पाने बारीक करून त्याची पातळसर पेस्ट बनवा आणि त्यात एक चमचा दही घाला. हा फेसमास्क चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटे तो चेहऱ्यावर तसाच राहू द्या. यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
३. जास्वंदीचे फुल आणि मधाचा स्क्रब :- जास्वंदीच्या फुलांमधील अँटिऑक्सिडंट गुणधर्म आणि मधाचे मॉइश्चरायझिंग गुणधर्म एकत्रितपणे त्वचा मऊ आणि त्वचेवरील काळे डाग कमी करतात. स्क्रब तयार करण्यासाठी जास्वंदीच्या फुलांची व पानांची पावडर आणि मध मिसळून स्क्रब तयार करा. या स्क्रबने चेहऱ्यावर ५ ते १० मिनिटे मसाज करा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे.