पुर्वी ज्याचे केस पांढरे दिसायचे, त्याने वयाचा एक विशिष्ट टप्पा ओलांडला आहे, असं समजलं जायचं. पण हल्ली केस पांढरे होण्याचा आणि वयाचा काहीही संबंध उरलेला नाही. कारण आता तर अगदी शाळकरी मुलांचे केसही पांंढरे होताना दिसत आहेत. केस पांढरे झाले की मग ते कलर करणे किंवा त्यावर मेहंदी लावणे ओघाने आलेच. मेहंदी लावण्यापेक्षा केस कलर करणे सोपे आणि शिवाय झटपट होणारे. त्यामुळे अनेक जण कलर वापरायलाच प्राधान्य देतात. पण केस कलर केलेले असो किंवा मेहंदी लावलेले असो, थोड्या दिवसांची रंग जातोच. आणि वारंवार कलर करणं जिवावरही येतंच. म्हणूनच केसांना केलेला कलर जास्त दिवस टिकावा (How To Keep Dyed Hair Healthy), म्हणून जास्वदाच्या फुलांचं हे होममेड कंडिशनर केसांना लावून पाहा (What to do for colour treated hair last longer?).
जास्वंदाच्या फुलामध्ये केसांसाठी उपयुक्त ठरतील असे भरपूर पोषक घटक असतात. त्यामुळे अगदी प्राचीन काळापासून आपल्याकडे जास्वंदाच्या पानांचा, फुलांचा उपयोग केसांच्या वाढीसाठी केला जातो.
खूप टेन्शन येतं, मन शांत नाही? चक्रासन करा, मलायका अरोरा सांगतेय चक्रासन करण्याचे ५ फायदे
जास्वंदाच्या पानांपासून, फुलांपासून तेल कसं तयार करायचं, हे तर आपण जाणतोच.आता केसांना केलेला रंग जास्त दिवस टिकण्यासाठी जास्वंदाच्या फुलांचं कंडिशनर कसं तयार करायचं ते पाहूया... हा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या mucherla.aruna या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
जास्वंदाच्या फुलांचं कंडिशनर
जास्वंदाच्या फुलांचं कंडिशनर तयार करण्यासाठी जास्वंदाची ६ ते ७ फुले घ्या. ती फुले एका भांड्यात टाका आणि त्यामध्ये फुलं पुर्णपणे बुडतील एवढंच पाणी टाका. आता हातानेच ती फुलं कुस्करा.
फुलं आणि पाणी अगदी एकजीव झालं की ते मिश्रण गाळून घ्या. गाळून घेतलेलं पाणी अगदी चिकट झालेलं असेल. हेच आहे आपल्या केसांसाठी तयार केलेलं जास्वंदाचं नॅचरल कंडिशनर. हे कंडिशनर केसांना लावा आणि साधारण अर्ध्या तासाने धुवून टाका. केसांचा रंग तर जास्त दिवस टिकेलच, शिवाय केसही मुलायम, सिल्की आणि चमकदार होतील.