आयुर्वेदात जास्वंदाच्या फुलाला अधिक महत्व आहे (Hair Growth). या सुंदर आणि तेजस्वी फुलामध्ये इतके गुणधर्म आहेत, जे केसांच्या अनेक समस्या सोडवू शकतात. या फुलामध्ये जास्त प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात (Hibiscus Flower). जे हेअर ग्रोथपासून ते हेअर फॉल रोखण्यापर्यंत सर्वच बाबतीत प्रभावी ठरतात (Hair care Tips). यासह केस अकाली पांढरी होत असतील तर, त्यावरही आपण या फुलाचा वापर करून पाहू शकता.
मुख्य म्हणजे या फुलाचा नियमित वापर केल्याने, टक्कल पडलेल्या पॅचवर केसही वाढू शकतात. अशावेळी जास्वंदाच्या फुलांचा केसांसाठी वापर कसा करावा? या फुलाचे केसांसाठी होणारे फायदे किती? ज्वासंदाच्या फुलाचा केसांवर खरंच सकारात्मक परिणाम होऊ शकतो का? पाहूयात(Hibiscus For Hair Growth: Benefits + How To Use).
जास्वंदाचे तेल
ICMR सांगते उन्हाळ्यात उसाचा रस पिणे टाळा; येऊ शकतो हृदयविकाराचा झटका- मधुमेह आणि..
केसांच्या वाढीसाठी जास्वंदाचे तेल फायदेशीर ठरू शकते. हे तेल तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये खोबरेल तेल घ्या. खोबरेल तेल गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात जास्वंदाची काही फुलं घाला. फुले खोबरेल तेलात उकळवा. नंतर तेल गाळून एका बॉटलमध्ये काढून घ्या. या तेलाचा वापर स्काल्पवर करा. काही वेळानंतर केस धुवून घ्या.
जास्वंदाचा हेअर मास्क
आपण हिबिस्कसचा हेअर मास्क बनवून केसांना लावू शकता. हिबिस्कस हेअर मास्क बनवण्यासाठी हिबिस्कसची पाने बारीक करा. त्यात दही घालून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट स्काल्पवर लावा. २५ मिनीटानंतर केस पाण्याने धुवा. या हेअर मास्कमुळे केसांना व्हॉल्यूम मिळेल आणि केस दाट होतील.
किती पाणी प्यायल्यानं शरीरातलं बॅड कोलेस्टेरॉल कमी होतं? तज्ज्ञ सांगतात; हृदय निरोगी ठेवायचं तर..
जास्वंदाचे पाणी
केसांच्या वाढीसाठी आपण घरात जास्वंदाचं पाणी तयार करू शकता. यासाठी एका बाटलीत स्वच्छ पाणी भरा. त्यात काही जास्वंदाची पानं घाला. काही तासांनंतर हे पाणी केसांवर लावा. आपण हे पाणी रात्रभर केसांवर लावून ठेऊ शकता. यामुळे केस सिल्की होतील. शिवाय केसांना नवी चमक मिळेल.