केसांच्या समस्या टाळण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या हेअर केअर उत्पादनांचा वापर करतात. (How To Grow Hairs Naturally) पण केमिकल्सयुक्त उत्पादनांच्या वापरामुळे केस गळण्याची भिती असते. केस गळू नयेत यासाठी आयुर्वेदीक उपाय करायला हवेत. (Hibiscus Leaf Powder For Hair Growth) जर तुम्ही कोणतेही आयुर्वेदीक उपाय शोधत असाल तर जास्वंदाचा फुल हा उत्तम पर्याय आहे. (Beauty Tips) जास्वंदाचे फुल तुम्हाला सहज कुठेही उपलब्ध होईल. जास्वंदाच्या फुलाचा पुजेप्रमाणे सौंदर्य उत्पादनांमध्येही वापर केला जातो. (Hibiscus For Hair Growth)
सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये जास्वंदाची फुलं घ्या, त्यात जास्वंदाची पानं, कढीपत्ता घाला आणि एलोवेरा जेल घाला. त्यात चमचाभर कॅस्टर ऑईल घाला. (Benefits Of Hibiscus Oil For Your Hair) ही पेस्ट एका बाऊलमध्ये ठेवा आणि ही पानं डोक्यावर लावा. केसांच्या मुळांना आणि केसांच्या लांबीला ही पेस्ट लावा. ही पेस्ट सुकल्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे केसांची वाढ चांगली होईल आणि केस पांढरेसुदधा होत नाहीत. (5 Ways To Use Hibiscus For Hair)
जास्वंदाच्या फुलांचा हेअर मास्कसुद्धा केसांसाठी फायदेशीर ठरतो. (Effective Ways To Use Hibiscus For Your Hairs) हा हेअर मास्क तयार करण्यासाठी जास्वंदाचे फुल आणि पानं मिसळून पेस्ट तयार करून घ्या ही पेस्ट केसांना लावा आणि काही वेळाने केस स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून २ वेळा ही पेस्ट डोक्यावर लावल्यानं केस वाढण्यास मदत होईल. (Tips To Use Hibiscus Leaves For Hair Growth)
पोट सुटलंय, मांड्यांचा शेप बिघडला? १० दिवस सकाळी हे पाणी प्या, झरझर घटेल चरबी-स्लिम दिसाल
1) जास्वंदाचे तेल
जास्वंदाचे तेल केसांना लावण्यासाठी ८ ते १० पानं आणि जास्वंदाची फुलं एकत्र दळून घ्या आणि जाडसर पेस्ट बनवा. एका वाटीत तेल घ्या. तुम्ही नारळाचे तेल घेऊ शकता. नारळाचे तेल उकळल्यानंतर त्यात जास्वंदाची पेस्ट घाला. ही तेल व्यवस्थित शिजल्यानंतर एका बॉटलमध्ये भरून ठेवून द्या. हातावर हे तेल घेऊन केसांच्या मुळांची मसाज करा नंतर स्वच्छ पाण्याने केस धुवा.
2) जास्वंद आणि आवळ्याचा हेअर मास्क
आवळा केसांसाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरतो. आवळा आणि जास्वंद एकत्र मिसळून केसांना लावल्यास केसांवर चांगला परिणाम दिसून येतो. हा हेअर मास्क बनवण्यासाठी जास्वंदाचे फुल आणि पानं एकत्र मिसळून याची पेस्ट तयार करा. यासाठी तुम्ही सुकलेले आवळेसुद्धा घेऊ शकता. तिन्ही गोष्टी एकत्र मिसळून पेस्ट तयार करा. तयार पेस्टने केसांना मसाज करा. ४५ ते ५० मिनिटं ही पेस्ट केसांना लावून ठेवा. आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क तुम्ही केसांना लावू शकता.