हल्ली केसांच्या तक्रारी खूप वाढल्या आहेत. त्यातही केस गळण्याचं (hair fall) आणि अकाली पांढरे (gray hair) होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. अगदी तरुण वयातल्या मुला- मुलींचे केस पांढरे होताना दिसत आहेत. तर काही जणांचे केस खूपच जास्त गळत आहेत. या तक्रारींवर उपाय म्हणून आपण वेगवेगळे हेअर प्रोडक्ट्स (hair products) वापरून बघतो. पण त्याचा मात्र अनेकदा काहीच उपयोग होताना दिसत नाही. म्हणूनच केसांच्या तक्रारी दूर करण्यासाठी जास्वंदाचा चहा (hibiscus tea) घ्या, असा सल्ला आहारतज्ज्ञ किरण कुकरेजा यांनी दिला आहे. हा चहा कसा करायचा आणि जास्वंदाचा केसांसाठी कसा उपयोग होतो, याची माहिती त्यांनी nuttyovernutritionn या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
जास्वंदाचे केसांना होणारे फायदे
१. आयुर्वेदानुसार असं सांगितलं जातं की अंगातली अतिरिक्त उष्णता हे केस गळण्याचं एक कारण असू शकतं. त्यामुळे अंगातली उष्णता कमी करण्यासाठी जास्वंदाचा उपयोग होऊ शकतो.
२. जास्वंदामुळे शरीरातील पित्त दोष कमी करण्यासाठी आणि शरीरातला दाह कमी होण्यासाठी मदत होते. त्याचा चांगला परिणाम आपोआपच केसांच्या वाढीवर दिसून येतो.
३. जास्वंदाच्या फुलांमध्ये व्हिटॅमिन सी आणि ॲण्टीऑक्सिडंट्स यांचे प्रमाण भरपूर असते.
४. जास्वंदामध्ये असणारे फ्लॅवोनॉईड्स आणि अमिनो ॲसिड केसांची चांगली वाढ होण्यासाठी मदत करतात.
जास्वंदाचा चहा कसा करायचा?
१. जास्वंदाचा चहा करण्यासाठी सगळ्यात आधी जास्वंदाचं एखादं फ्रेश फुल तोडून घ्या. शक्यतो लाल रंगाच्या गावरान जास्वंदाचा उपयोग हा चहा करण्यासाठी करावा.
२. यानंतर एक वाटी पाण्यात जास्वंदाच्या पाकळ्या १० मिनिटांसाठी भिजत घाला.
महालक्ष्मी विसर्जनाला नैवैद्य दहीभातच का करतात? दहीभात खाण्याचे ५ फायदे, पारंपरिक आहाराचे महत्त्व
३. यानंतर एका पातेल्यात कडक पाणी घ्या. त्यात जास्वंदाच्या या भिजवलेल्या पाकळ्या आणि १ टी स्पून हिरवा चहा टाका. हे मिश्रण हलवा आणि १० मिनिटे तसेच राहू द्या.
४. यानंतर हा चहा गाळून घ्या आणि गरम असतानाच पिऊन घ्या.
५. हा उपाय काही दिवस नियमित केल्यास केसगळती कमी होईल.