केसांच्या संबंधित समस्या टाळण्यासाठी वेगवेगळे घरगुती उपाय केले जातात. काही घरगुती उपाय केल्यास केस दाट होण्यास मदत होते. जास्वंद आणि कडुलिंबाचा हेअर मास्क तुम्ही केसांना लावू शकता. जास्वंदांचा हेअर मास्क बनवण खूपच सोपं आहे. (Hair Care Tips) जास्वंदात अनेक औषधी तत्व असतात. यात व्हिटामीन सी, फ्लेवेनॉईड्स, अमिनो एसिड, एंटी ऑक्सिडेंट्सचे प्रमाण भरपूर असते कडुलिंब औषधी गुणांनी परिपूर्ण असतोच यात एंटीबॅक्टेरिअल आणि एंटीफंगल गुण असतात. (Hibiscus With Neem Hair Mask For Hair Fall Control Hair Growth Silky And Shiny Hairs)
क्लिनिकलीच्या रिपोर्टनुसार यामुळे हेअर ग्रोथ होण्यास मदत होते, हेअर फॉल कंट्रोलमध्ये येतो. यात एंटी इन्फामेटरी प्रॉपर्टीज असतात. जास्वंदात औषधी गुण असतात. यात एंटीइफ्लामेटरी आणि एंटीफंगल गुण असतात (Ref). ज्यामुळे केसांमधला कोंडा कमी होण्यास मदत होते. जास्वंदात अमिनो एसिड्स, व्हिटामीन्स आणि एंटीऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे केस मजबूत राहतात, डोक्यावर रक्तप्रवाह चांगला राहतो. यात नॅच्युरल एंस्ट्रींजंट प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते.
दूध-दह्यापेक्षा जास्त कॅल्शियम देतात ७ पदार्थ; रोज खा-मिळेल भरपूर ताकद-कंबरदुखी टळेल
जास्वंद आणि कडुलिंबाचा हेअर मास्क
कडुलिंबात व्हिटामीन ई, फॅटी एसिड्स आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. कडुलिंब आणि जास्वंदाचा हेअर मास्क तुम्ही लावू शकता. हा हेअर मास्क केसांना लावल्यानं केस गळणं थांबतं आणि केसांची वाढ चांगली होते. कडुलिंब आणि जास्वंदाचा हेअर मास्क बनवण्यासाठी जास्वंदाच्या फुलाची पावडर आणि कडुलिंबाच्या पानांची पावडर एकत्र मिक्स करा. त्यात गरजेनुसार दही घाला ही पेस्ट स्काल्पवर लावून केसांच्या मुळांना लावा आणि अर्ध्या तासानं केस धुवून स्वच्छ करा. ज्यामुळे केसांना चमक येईल याशिवाय केस वाढण्यास मदत होईल आणि केस तेलकट होणार नाहीत.
जास्वंद केसांवर या पद्धतीनं लावा
जास्वंदाला केसांवर वेगवेगळ्या पद्धतीनं लावता येतं. जास्वंदाची फुलं आणि पानं नारळाच्या तेलात मिसळून जास्वंदाचे तेल बनवू शकता. जास्वंदाच्या तेलानं केसांची मालिश केल्यास केस वाढण्यास मदत होईल. आठवड्यातून २ ते ३ वेळा तुम्ही हे तेल केसांना लावू शकता.
केसांचे गळणं थांबवण्यासाठी जास्वंदाच्या पावडरमध्ये कांद्याचा रस मिसळून हेअर मास्क तयार करा. हा हेअर मास्क स्काल्पवर १५ ते २० मिनिटं लावू ठेवा नंतर केस धुवा. कांद्याचा रस केसांच्या मुळाशी जाण्यास मदत करेल. जास्वंदाची फुलं वाटून एलोवेरा जेल सोबत मिसळून केसांना लावू शकता. हा हेअर मास्क तयार करण्यासाठी २ चमचे जास्वंदाच्या फुलाची पेस्ट आणि एक कप एलोवेरा जेल मिसळून हेअर मास्क तयार करा. केसांवर ४० ते ४५ मिनिटं लावून ठेवा. त्यानंतर केस स्वच्छ पाण्यानं धुवा.