रोज कितीही स्वच्छ अंघोळ केली तरी मान, पाठ, चेहऱ्यावर काळेपणा येतो. चेहऱ्यावर स्क्रब, फेशियल करून चेहरा उजळवता येतो पण मान आणि पाठीचं टॅनिंग तसंच राहतं. मानेची त्वचा सुंदर दिसावी यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता. बॉडी पॉलिशिंग- बॉडी ब्लिच यांसारख्या महागड्या ट्रिटमेंट्स न घेता अगदी सोप्या पद्धतीने टॅनिंग निघू शकतं. (6 Effective Home Remedies to Remove Tan)
१) पाठीचा काळेपणा दूर करण्यासाठी सगळ्यात आधी लिंबावर टुथपेस्ट लावा. त्यावर कॉफी आणि साखर घाला. लिंबाच्या साहाय्याने पाठीवर घासा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. या उपायाने पाठीवरचं टॅनिंग निघून जाईल आणि त्वचा उजळदार दिसेल.
२) एका भांड्यात एक चमचा बेसन काढून त्यात लिंबाचा रस घाला. नंतर दोन चमचे दही आणि एक चमचा गुलाबपाणी मिसळा. या सर्व गोष्टी नीट मिसळा आणि पाठीवर स्क्रब करा. नंतर हे मिश्रण पाठीवर ५ मिनिटे राहू द्या. मग ओल्या हातांनी पाठ स्वच्छ करा.
३) एका भांड्यात तीन चमचे मैदा, दोन चमचे दही आणि लिंबाचा रस घाला आणि चांगले मिसळा. हे मिश्रण पाठीवर लावून 10 मिनिटे राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने पाठ धुवा.
४) एका भांड्यात एक मोठा चमचा मसूर डाळीची पावडर टाका आणि त्यात लिंबाचा रस घाला. नंतर त्यात एक चमचा कोरफडीचा गर आणि दही टाका. सर्व गोष्टी नीट मिसळा आणि पाठीला लावा. नंतर स्क्रब करा. हे मिश्रण कोरडे होऊ द्या. ते सुकल्यावर टॉवेलने वाळवा.
रोज गळून केस विरळ झाले? महिनाभर ८ पदार्थ खा, भराभर वाढतील केस, दाट-शायनी दिसतील
५) कोरफडीमुळे त्वचेला अनेक समस्यांपासून आराम मिळतो. ताज्या कोरफडीचे तेल पाठीवर घासा. कोरफडीमध्ये असलेले अॅलोइन हे डिपिगमेंटेशनसाठी एक नैसर्गिक घटक आहे, ज्यामुळे काळेपणा सहज दूर होतो आणि त्वचा थंड राहते.
६) बटाट्याचा रस शरीराच्या अनेक समस्या सहज दूर करतो. हा रस वापरण्यासाठी बटाट्याच्या रसात लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण पाठीवर लावा आणि हलक्या हाताने चोळा. असे केल्याने पाठीचा काळेपणा सहज दूर होईल.