Join us  

दिवाळीची तयारी करुन दमलात, चेहरा थकल्यासारखा दिसतोय? घरीच करा ऑइल फेशियल- दिवाळीच चेहरा चमकेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 2:26 PM

Home Facial For Diwali : घरच्याघरी स्वत:साठी फक्त १५ ते २० मिनिटं वेळ काढून तुम्ही चेहरा उजळवू शकता. (How to get glowing skin)

दिवाळीला नव्या ड्रेसमध्ये उठून, खुलून दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. (How to do Fecial at Home) पण फराळ बनवण्याची घाई, साफसफाई, ऑफिसच्या कामाची दगदग  यामुळे स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. (Home Facial For diwali) पार्लरलामध्ये  जायचं म्हणजे एकावेळी हजार, दोन हजार रुपये खर्च करावे लागतात. घरच्याघरी स्वत:साठी फक्त १५ ते २० मिनिटं वेळ काढून तुम्ही ऑईल फेशियल करून चेहरा उजळवू शकता. (How to get glowing skin)

ऑईल फेशियलसाठी लागणारं साहित्य

१) नारळाचं किंवा बदामाचं तेल२)  गुलाब पाणी३) चंदन पावडर४) तांदळाचे पीठ

फेशियल करण्याची योग्य पद्धत

- तुम्ही खोबरेल तेल किंवा बदाम तेल यांपैकी कोणतेही एक तेल निवडू शकता. आता प्रथम चेहरा धुवा आणि फेशियलसाठी त्वचा तयार करा.

- हातामध्ये थोडे तेल घेऊन चेहऱ्याला लावा, डोळ्याखाली आणि पापण्यांवरही लावा. आता चेहऱ्याला वर्तुळाकार गतीने मसाज करणे सुरू करा.

- हाताचा दाब हलका ठेवा हात फक्त घड्याळाच्या दिशेने फिरवा. 5 ते 7 मिनिटे मसाज करा आता चंदन पावडर-गुलाब पाणी आणि तांदळाचे पीठ मिक्स करून फेस पॅक तयार करा.

- हा फेस पॅक 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा ताजे पाण्याने धुवा आणि मॉइश्चरायझर लावा.

ऑईल फेशियलचे फायदे

१) तेल फेशियल विशेषतः कोरडी त्वचा असलेल्या महिलांसाठी सर्वोत्तम आहे. पण त्वचेची चमक वाढवण्यासाठीही तुम्ही याचा वापर करू शकता. 

२) नारळाच्या तेलात लिनोलिक अॅसिड, व्हिटॅमिन-एफ आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे फक्त 5 मिनिटांच्या मसाजमध्ये तुमच्या त्वचेची चमक वाढवते.

३) खोबरेल तेलाचा फेस सीरम म्हणूनही त्वचेवर वापर करता येईल. कारण त्यामुळे त्वचा बरी होण्याचा वेग वाढण्यास मदत होते.

४) हे ऑइल फेशियल महिन्यातून दोनदाच वापरा. त्वचा डागरहित आणि चमकदार राहील. दिवाळीच्या आधी तुम्ही हे फेशियल केल्यास त्वचा जास्त ग्लोईंग दिसेल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी