Join us  

DIY: फक्त ३ स्टेप्समध्ये स्वतःच करा स्वतःचा परफेक्ट लेअर कट! विसराल महागडं पार्लर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2022 2:16 PM

How To Do Layer Cut At Home: पार्लरएवढाच छान आणि ३ ते ४ लेअर असणारा स्टायलिश हेअर कट (own hair cut) अगदी १० ते १५ मिनिटांत घरच्याघरी करता येतो.. बघा त्यासाठीच ही खास आयडिया..(home hacks for hair cut)

ठळक मुद्देशिकून घ्या स्वत:च स्वत:चा स्टायलिश लेअर कट कसा करायचा.. अगदी सोपं आहे ते. फक्त १५ ते २० मिनिटे स्वत:साठी काढा आणि या ३ स्टेप्स व्यवस्थित फॉलो करा.

आजकाल लेअर कट (layer cut), स्टेप कट यांची खूपच क्रेझ आहे. यु कट किंवा स्ट्रेट कट यापेक्षा असे लेअर्समध्ये मोकळे सोडलेले किंवा क्लचर लावून बांधलेले केस खरोखरंच खूप आकर्षक दिसतात. तुमचा लूक बदलून टाकण्यासाठी लेअर किंवा स्टेप कट खरोखरंच खूप उपयुक्त ठरतात. असे हेअर कट जर बाहेर पार्लरमध्ये जाऊन केले तर कमीतकमी २५० रुपये तरी मोजावेच लागतात. तुम्ही किती लेअर करणार, केसांची लांबी किती यावर पैसे वाढत जातात. (parlour style hair cut at home) 

 

शिवाय प्रत्येकवेळी पार्लरमध्ये जायला वेळ मिळतोच असे नाही. कधीकधी कामाच्या धावपळीत आपल्या आणि पार्लरच्या वेळा जुळत नाही. किंवा कधीकधी आपल्याला स्वत:लाच पार्लरमध्ये जाण्याचा खूप कंटाळा आलेला असतो. असं कोणतंही कारण असलं तरी त्यासाठी तुमचा हेअरकट मात्र राहून जायला नको ना.. त्यासाठीच शिकून घ्या स्वत:च स्वत:चा स्टायलिश लेअर कट कसा करायचा.. अगदी सोपं आहे ते. फक्त १५ ते २० मिनिटे स्वत:साठी काढा आणि या ३ स्टेप्स व्यवस्थित फॉलो करा.(3 steps to cut your own hair at home)

 

कसा करायचा स्वत:चा लेअर कट?१. सगळ्यात आधी तर केसांतला सगळा गुंता काढून घ्या केसांवर थोडं पाणी शिंपडून ते थोडे ओले करून घ्या. यानंतर सगळे केस पुढच्या बाजूने वळवा आणि सगळ्यात पुढे कपाळावर केसांना एक रबरबँण्ड लावून टाका.२. आता तुम्हाला केसांची लांबी किती कमी करायची आहे ते ठरवा. साधारणपणे बोटभर तरी केस कापावेत. जेणेकरून लेअर अधिक छान दिसतात आणि जर काही फाटे फुटलेले केस असतील, तर ते देखील निघून जातात. केस किती कापायचे हे ठरलं की कात्री थोडी तिरकी पकडा आणि झिगझॅग लाईन दिसेल अशा पद्धतीने केस कापा. 

३. आता रबरबॅण्ड सोडून टाका. केस व्यवस्थित विंचरून घ्या. दुसऱ्या स्टेपमध्ये तुमच्या केसांचे दोन भाग करा. कानाच्या मागच्या बाजुचा जो मध्यभाग आहे तिथून वरचा एक भाग आणि खालच्या केसांचा दुसरा भाग करा. खालचे केस तसेच राहू द्या. वरचे केस पुन्हा एकदा पुढे वळवून कपाळावर मधोमध त्याला रबरबॅण्ड लावा. मागे जसे झिगझॅक केस कापले तसेच पुन्हा कापा. मागच्यावेळी जेवढ्या लांबीचे केस कापले होते, तेवढ्याच लांबीचे यावेळीही कापा.४. आता पुन्हा केस मोकळे सोडा. सारखे करा. गुंता काढून विंचरून घ्या. आता कानाच्या बोटभर वर असणारे केस पुढे वळवा आणि कपाळावर मधाेमध रबरबॅण्ड लावा. आता पुन्हा एकदा झिगझॅक केस कापा. लेअर कट झाला तयार.५. साईडलॉक करायचे असेल तर मधोमध भांग पाडा. भांगाच्या दोन्ही बाजूने साधारण २- २ बोट केस पुढे घ्या आणि तुम्हाला जेवढ्या लांब बटा पाहिजे आहेत, त्यानुसार कापून टाका. कट केलेले केस एकदा छान सेट करून घ्या. ६. केस पातळ असतील तर २ किंवा ३ स्टेप्स कराव्या. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी