चपाती (Chapati) हा भारतीयांच्या रोजच्या खाण्यातील एक भाग आहे चपातीशिवाय अनेकांचे जेवण अपूर्ण असते. चपातीशिवाय जेवणच पूर्ण होत नाही. पण परफेक्ट चपात्या करणं मोठ्या टास्कप्रमाणेच आहे. गोल मुलायम चपात्या करणं सर्वांनाच जमतं असं नाही. (How To Make Gol Roti) नवविवाहीत तरूणींची अनेकदा चपाती करण्यावरून मस्करी केली जाते. अनेक प्रयत्नांनंतरही बऱ्याचजणी नश्त्यासारखी चपाती बनवतात पोळपाट लाटणं न वापरात गोल चपात्या करण्यासाठी तुम्हाला कोणत्याीही मशीनची गरज भासणार नाही. हातांनी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने चपात्या बनवू शकता. (Home Hacks How To Make Chapati)
गोल चपात्या कशा बनवायच्या (How To Make Round Roti's)
अलिकडेच एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला. त्यात एक मुलगी पोळपाट लाटण्याशिवाय चपाती बनवताना दिसते. अशा चपात्या करण्यासाठी तुम्हाला फक्त २ गोष्टींची आवश्यकता असेल. यासाठी सगळ्यात आधी एक प्लास्टीक आणि एक गोल प्लेट घ्या. जी चपातीच्या आकाराची असायला हवी. चपातीचा गोळा प्लास्टीकच्या खाली ठेवा. त्यानंतर प्लेट त्यावर ठेवून व्यवस्थित दाबा. या उपायाने पूर्ण गोल चपाती तयार होईल.
गोल चपात्या कशा बनवाव्यात?
सगळ्यात आधी पीठ व्यवस्थित मलून घ्या. नंतर आपल्या हाताला तूप लावून पेढ्याच्या आकाराप्रमाणे शेप द्या. नंतर बोटांनी फिरवत राहा. हलक्या हाताने पीठ गोलाकार खेचा. जेव्हा गोलाकार तयार होईल तेव्हा दोन्ही हातांनी थापून चपाती गोल करून घ्या.
पोळ-पाट लाटणं न वापरता चपाती करण्याासाठी सगळ्यातआधी एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्या. त्यात गरजेनुसार पाणी आणि मीठ घालून डोश्याप्रमाणे पातळ बॅटर तयार करून घ्या. तयार मिश्रण तव्यावर घालून एका बाजूने व्यवस्थित शेकून घ्या. एक बाजू शिजल्यानंतर चपाती चमच्याने फिरवून घ्या. तयार असेल गरमागरम चपाती.