Lokmat Sakhi >Beauty > DIY: चिकट, चिपचिप्या केसांसाठी घरीच बनवा डिप कंडिशनर! केस होतील सिल्की आणि मुलायम

DIY: चिकट, चिपचिप्या केसांसाठी घरीच बनवा डिप कंडिशनर! केस होतील सिल्की आणि मुलायम

Hair care tips : नुकताच शाम्पू केला तरी केस पुन्हा चिकट आणि चिपचिप  (oily hair) होतात? मग आता तुमच्या केसांसाठी घरीच तयार करा डिप कंडिशनर. केसांचं होईल योग्य पोषण आणि केस होतील सिल्की (silky), मुलायम... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 07:19 PM2021-11-22T19:19:22+5:302021-11-22T19:20:04+5:30

Hair care tips : नुकताच शाम्पू केला तरी केस पुन्हा चिकट आणि चिपचिप  (oily hair) होतात? मग आता तुमच्या केसांसाठी घरीच तयार करा डिप कंडिशनर. केसांचं होईल योग्य पोषण आणि केस होतील सिल्की (silky), मुलायम... 

Home hacks: Make deep conditioner for oily hair at home, simple trick for getting silky hair | DIY: चिकट, चिपचिप्या केसांसाठी घरीच बनवा डिप कंडिशनर! केस होतील सिल्की आणि मुलायम

DIY: चिकट, चिपचिप्या केसांसाठी घरीच बनवा डिप कंडिशनर! केस होतील सिल्की आणि मुलायम

Highlightsया उपायामुळे डोक्याच्या त्वचेची पीएच लेव्हल संतूलित राहते आणि केस चिकट, चिपचिपीत होत नाहीत. 

काही जणींचे केस इतके छान असतात की धुतल्यानंतर अगदी रेशमासारखे मऊ, मुलायम दिसू लागतात. केसांना छान चमक येते आणि विशेष म्हणजे जोपर्यंत तेल लावल्या जात नाही, तोपर्यंत ते तसेच छान, सुळसुळीत सिल्की राहतात. पण त्याउलट मात्र काही जणींचे केस असतात. केस सकाळी धुतले की संध्याकाही किंवा फारफार तर दुसऱ्यादिवशी पुन्हा ऑईली, चिकट आणि चिपचिपीत होऊन जातात. केसांना तेल लावले नाही, तरी ते अगदी चापून चोपून तेल लावल्यासारखे चिकट होऊन जातात. ही समस्या जर तुमच्या केसांबाबतही होत असेल, तर नक्कीच तुमच्या केसांना काही विशेष पोषण देण्याची गरज आहे.

 

केस धुतल्यानंतर लगेचच चिपचिपित होतात, याचा अर्थ असा की तुमच्या डोक्याच्या त्वचेतून सिबम नावाचा पदार्थ गरजेपेक्षा जास्त स्त्रवतो. त्यामुळे तुमचे केस तेल न लावताही चिकट होतात. ही समस्या सोडवायची असेल, तर डोक्याच्या त्वचेची (scalp) पीएच लेव्हल (ph level) संतूलित असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण बरीच महागडी उत्पादनं वापरली तरी केसांची ही समस्या कमी होत नाही. म्हणूनच महागड्या उत्पादनांवर पैसे खर्च करण्यापेक्षा हा सोपा घरगुती उपाय करून बघा. हा उपाय करण्यासाठी आपण सगळे घरगुती सामान वापरणार असल्याने यामुळे केसांचे कोणतेच नुकसान होणार नाही.

 

चिकट केसांसाठी घरीच तयार करा डिप कंडिशनर
- शाम्पू लावल्याने केस स्वच्छ होतात. पण केसांचं पोषण होण्यासाठी आणि त्यांचा पोत सुधारण्यासाठी त्यांना कंडिशनर लावणं गरजेचं असतं. म्हणून केसांसाठी अशा पद्धतीने डिप कंडिशनर घरीच तयार करा. 
- हा उपाय इन्स्टाग्रामच्या beauty_people या पेजवर शेअर करण्यात आला आहे. 
- कंडिशनर तयार करण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन ई कॅप्सूल, ३ टेबलस्पून नारळाचं तेल, २ टेबलस्पून दही, २ टेबलस्पून मध असं साहित्य लागणार आहे.


- हे सगळं साहित्य एका मोठ्या वाटीत एकत्र करा. सगळं साहित्य व्यवस्थित हलवून त्याची पेस्ट तयार करा. 
- ही पेस्ट आता तुमच्या डोक्याच्या त्वचेला लावा. पेस्ट डोक्यावर रगडू नका. हळूवार हाताने लावा.
- यानंतर एक ते दिड तास केस तसेच बांधून ठेवा आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका.
- दही, मध, नारळाचं तेल या गोष्टींमुळे केसांचं छान पोषण होतं. तसेच व्हिटॅमिन ई मुळे केस चमकदार आणि सिल्की होतात.
- या उपायामुळे डोक्याच्या त्वचेची पीएच लेव्हल संतूलित राहते आणि केस चिकट, चिपचिपीत होत नाहीत. 

 

Web Title: Home hacks: Make deep conditioner for oily hair at home, simple trick for getting silky hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.