आपल्या आहारातून केसांना पुरेसं पोषण मिळत नाही. त्यामुळे हल्ली केसांच्या समस्या खूप जास्त वाढत चालल्या आहेत. कोणाचे केस खूप गळत आहेत तर कोणाच्या केसांना वाढच नाहीये. याशिवाय केस कमी वयात पांढरे होण्याचं प्रमाणही खूप वाढलेलं आहे. त्यामुळेच केसांच्या या सगळ्या तक्रारी कमी करण्यासाठी आवळा अतिशय उपयुक्त ठरतो. म्हणूनच तर केसांसाठी असलेल्या विविध उत्पादनांमध्ये आवळा हा एक प्रमुख घटक असतो (home made amla oil for reducing hairloss). म्हणूनच आता केसांसाठी नैसर्गिक पद्धतीने आवळ्याचं तेल कसं तयार करायचं ते पाहा (how to make amla oil at home). हा उपाय केल्यास ८ दिवसांतच केस गळणं कमी झाल्याचं जाणवेल असं ब्यूटी एक्स्पर्ट सांगत आहेत. (best home remedies for hair growth)
केस गळणं कमी करण्यासाठी कसा करायचा आवळ्याचा उपयोग?
केस गळणं कमी करण्यासाठी घरच्याघरी एकदम सोप्या पद्धतीने आवळ्याचं तेल कसं तयार करायचं, याविषयीचा व्हिडिओ rohitsachdeva1 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
मांड्यांवरची चरबी दिवसेंदिवस वाढतच चालली? रोज ५ योगासनं करा, मांड्यांची जाडी होईल कमी
हा उपाय करण्यासाठी आपल्याला १ आवळा आणि अर्धी वाटी ऑलिव्ह ऑईल लागणार आहे. ऑलिव्ह ऑईल नसेल तर कॅस्टर ऑईल किंवा तिळाचं तेलदेखील तुम्ही वापरू शकता.
सगळ्यात आधी आवळ्याचे लहान लहान तुकडे करा आणि ते ४ ते ५ तासांसाठी ऑलिव्ह ऑईलमध्ये भिजत घाला.
यानंतर हे तेल एका कढईमध्ये टाका आणि ३ ते ४ मिनिटे मध्यम आचेवर गरम करून घ्या. त्यानंतर गॅस बंद करा आणि तेल थंड झाल्यावर एका बरणीत गाळून भरून ठेवा.
जावेद हबीब सांगतात 'हा' पदार्थ मधात मिसळून चेहऱ्याला लावा- ॲक्ने, तेलकट त्वचेसाठी परफेक्ट उपाय
आता हे तेल आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळा केसांच्या मुळाशी लावून हलक्या हाताने मसाज करा. यानंतर कमीतकमी एक तास ते तुमच्या केसांवर राहू द्या. रात्रभर तेल तसंच केसांवर राहू दिलं तरी अधिक उत्तम. यानंतर मग नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून घ्या. अगदी एक- दोन वेळा हा उपाय केला तरी केस गळणं बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं असेल असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.