Lokmat Sakhi >Beauty > Skin Care Tips: रात्री लावा, सकाळी चेहऱ्यावर जादू! 3 गोष्टी वापरुन बनवा होममेड स्लिपिंग मास्क.. चेहरा चमकदार

Skin Care Tips: रात्री लावा, सकाळी चेहऱ्यावर जादू! 3 गोष्टी वापरुन बनवा होममेड स्लिपिंग मास्क.. चेहरा चमकदार

Skin Care Tips: महागडे नाईट क्रिम हवेत कशाला.. घरच्याघरी हा मास्क (home made night face mask) तयार करा.. काही दिवस नियमित लावा आणि दिवसेंदिवस तुमच्या चेहऱ्यामध्ये होणारा बदल तुम्ही स्वत:च अनुभवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 04:36 PM2022-03-30T16:36:32+5:302022-03-30T16:37:40+5:30

Skin Care Tips: महागडे नाईट क्रिम हवेत कशाला.. घरच्याघरी हा मास्क (home made night face mask) तयार करा.. काही दिवस नियमित लावा आणि दिवसेंदिवस तुमच्या चेहऱ्यामध्ये होणारा बदल तुम्ही स्वत:च अनुभवा..

Home made anti aging sleeping face mask to nourish your skin, useful for reducing wrinkles and rejuvenate your skin | Skin Care Tips: रात्री लावा, सकाळी चेहऱ्यावर जादू! 3 गोष्टी वापरुन बनवा होममेड स्लिपिंग मास्क.. चेहरा चमकदार

Skin Care Tips: रात्री लावा, सकाळी चेहऱ्यावर जादू! 3 गोष्टी वापरुन बनवा होममेड स्लिपिंग मास्क.. चेहरा चमकदार

Highlightsसाधारण पंचविशीनंतर रोज रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवा आणि एखादं नरिशिंग नाईट क्रिम लावा, असं सौंदर्यतज्ज्ञ सांगतात.

दिवसभर आपण घराबाहेर काम करतो, उन्हात फिरतो, धुळ- धूर यासारख्या प्रदुषणाचा सामनाही आपल्या त्वचेला करावा लागतो. त्यामुळे हा सगळा मारा झेलून त्वचा सुकून जाते. त्वचेलाही थकवा येतो. अर्थातच थकून घरी आल्यानंतर आपण चेहरा धुतो. पण त्वचेवरची मरगळ झटकून तिला पुन्हा रिफ्रेश (home remedies for glowing skin) करण्यासाठी तेवढं पुरेसं नसतं.. म्हणूनच साधारण पंचविशीनंतर रोज रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवा आणि एखादं नरिशिंग नाईट क्रिम (night cream) लावा, असं सौंदर्यतज्ज्ञ सांगतात.

 

चेहऱ्याला पोषण देण्यासाठी रात्री झोपताना त्वचेला काहीतरी मास्क किंवा क्रिम लावणं खरोखरंच गरजेचं आहे. पण महागडे नाईट क्रिम विकत घेऊन तेच त्वचेवर लावणे, हा काही त्यावरचा एकमेव उपाय नाही. म्हणूनच तर त्वचेसाठी अतिशय गुणकारी ठरणारा स्लिपिंग मास्क घरच्याघरी कसा तयार करायचा आणि त्यामुळे नेमके होणारे फायदे काय, हे आपण बघूया. या ब्यूटी टिप्सइन्स्टाग्रामच्या theglobalistagirl या पेजवर शेअर (instagram share) करण्यात आल्या आहेत. 

 

कसा करायचा स्लिपिंग मास्क?
- स्लिपिंग मास्क तयार करण्यासाठी अर्धा टिस्पून कॉफी, दोन टीस्पून ॲलोव्हेरा आणि एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल एवढं साहित्य लागेल.
- हे साहित्य एका बाऊलमध्ये घ्या आणि व्यवस्थित हलवून एकजीव करा.
- रात्री झाेपण्यापुर्वी चेहरा स्वच्छ धुवा. पुसून कोरडा करा आणि त्यानंतर हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि एखादा मिनिट हलक्या हाताने मसाज करा.
- यानंतर चेहरा धुण्याची गरज नाही. आता निवांत झोपा आणि सकाळी उठल्यानंंतर चेहरा धुवा. 
- हा उपाय नियमित केल्यास आठवडाभरातच तुम्हाला त्वचा फ्रेश, टवटवीत झालेली जाणवेल.
- हा स्लिपिंग मास्क लावून घराबाहेर किंवा धुळीत जाऊ नका. 


 
स्लिपिंग मास्क लावण्याचे फायदे
- कॉफी त्वचेला नविन उर्जा देते. त्यामुळे चेहरा फ्रेश आणि टवटवीत दिसू लागतो.
- व्हिटॅमिन ई मुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येणे थांबते.
- त्वचा कायम हायड्रेटेड राहते.
- पिंपल्सची समस्या असेल तर ती देखील या उपायाने कमी होईल.
- त्वचेवरील पिगमेंटेशन कमी होईल. 


 

Web Title: Home made anti aging sleeping face mask to nourish your skin, useful for reducing wrinkles and rejuvenate your skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.