Join us  

केस गळून गळून पातळ झाले? वापरा १ खास तेल, लांबसडक वाढतील केस-दिसाल सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2024 12:18 PM

Home made Ayurvedic hair oil for hair growth : केस कायम छान राहावेत यासाठी वेळीच उपचार केलेले केव्हाही चांगले.

केस लांबसडक वाढावेत अशी बहुतांश महिलांची इच्छा असते. पण काही ना काही कारणांनी ते गळतात नाहीतर वाढ खुंटते. केसांचे सौंदर्य हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. आपल्या आहारातून मिळणारे पोषण, अनुवंशिक केसांची ठेवण, प्रदूषण, आपण वापरत असलेली उत्पादने अशा बऱ्याच गोष्टींचा आपल्या केस वाढण्यामध्ये आणि त्यांचे आरोग्य चांगले राहण्यामध्ये सहभाग असतो. केस गळणे, वाढ खुंटणे, पांढरे होणे, कोंडा होणे अशा आपल्याला केसांबाबत बऱ्याच समस्या असतात. पण आपण वेळच्या वेळी त्याकडे पुरेसे लक्ष देत नाही आणि मग कालांतराने या समस्या वाढत जातात (Home made Ayurvedic hair oil for hair growth). 

असे होऊ नये आणि केस कायम छान राहावेत यासाठी वेळीच उपचार केलेले केव्हाही चांगले. पार्लरमध्ये आणि रासायनिक उत्पादनांवर हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास केसांचा पोत सुधारण्यास मदत होते. केस धुण्याआधी आपण त्यांना आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तेल लावतो. हे तेल साधारणपणे बाजारात मिळणारे खोबरेल तेल किंवा बदाम, आवळा असे तेल असते. पण त्यापेक्षा केस लांबसडक आणि दाट होण्यासाठी घरच्या घरी एक खास आयुर्वेदीक तेल तयार केल्यास केसांचे सौंदर्य खुलण्यास मदत होते. हे तेल करायचे ते आज आपण पाहणार आहोत.  

(Image : Google)

१. एका कढईमध्ये १ बाऊल खोबरेल तेल घेऊन ते मध्यम आचेवर गरम करायला ठेवावे. 

२. यामध्ये २ चमचे मेथ्या, २ चमचे काळे तीळ आणि १ बारीक चिरलेला कांदा घालायचा. 

३. यामध्ये ४ ते ५ लवंग, १० ते १५ प्रत्येकी तुळशीची आणि कडीपत्त्याची पाने घालावीत. 

४. गॅस बारीक करुन हे सगळे चांगले हलवत हलवत कांदा सोनेही होईपर्यंत उकळू द्यावे. 

५. त्यानंतर गॅस बंद करुन यामध्ये साधारण १ चमचा कोरफडीचा गर आणि व्हिटॅमिन इ कॅप्सूल घालाव्यात.

६. हे सगळे चांगले एकजीव होईपर्यंत मुरत ठेवायचे आणि कांद्याचा उग्र वास जाण्यासाठी यामध्ये थोडे इसेन्शियल ऑईल घालायचे.

७. हे तेल पूर्ण गार झाले की गाळून एका बाटलीत भरुन ठेवायचे आणि नेहमीप्रमाणे केसांना लावायचे. 

८. केस दाट, चमकदार होण्यासाठी आणि गळणे कमी होण्यासाठी आणि मुळं मजबूत होण्यासाठी या तेलाचा अतिशय चांगला फायदा होतो.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी