आपल्या त्वचेला नेहमीच धूळ, धूर, प्रदुषण, ऊन या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे मग त्याचा त्वचेवर परिणाम होतो आणि त्वचेचा पोत खराब होत जातो. त्वचेवरचं टॅनिंग, पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स, डेड स्किन वाढत जाते. हे सगळं कमी करण्यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन महागडं ब्लीच करतो. पण त्यासाठी दरवेळी जाणं अनेक जणींना शक्य होत नाही. तर काही जणींना ते सगळं खूप खर्चिक वाटतं (natural bleach for radiant glowing skin). म्हणूनच आता घरच्याघरी अगदी स्वस्तात मस्त पण पार्लरमधून ब्लीच केल्याप्रमाणेच सुंदर ग्लो देणारं ब्लीच कसं करायचं ते पाहा. (home made bleach for reducing dark spots and pigmentation)
घरगुती पदार्थांपासून ब्लीच कसं तयार करावं?
घरातलेच नेहमीचे पदार्थ वापरून ब्लीच कसं तयार करावं, याचा उपाय rohitsachdeva1 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
अनंत अंबानी आणि राधिकाच्या ‘मामेरू’ साेहळ्याची सगळीकडेच चर्चा! हा पारंपरिक सोहळा नेमका काय असतो?
हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो सगळ्यात महत्त्वाचा घटक वापरायचा आहे, तो म्हणजे मुलतानी माती. एका वाटीमध्ये २ टेबलस्पून मुलतानी माती घ्या.
त्यामध्ये आता एक चमचा लिंबाचा रस टाका. लिंबाचा रस नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून काम करतो. त्यामुळे चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन आणि डार्क स्पॉट्स बऱ्यापैकी कमी होतात.
आता त्या मिश्रणात १ टेबलस्पून मध टाका. मध टाकल्यामुळे त्वचेतलं मॉईश्चर टिकून राहण्यास मदत होते आणि त्याचा परिणाम म्हणजे त्वचा तरुण, चमकदार दिसते.
पब्लिक टॉयलेटमधली ही गोष्ट चुकूनही वापरू नका, तज्ज्ञ सांगतात बॅक्टेरियल इन्फेक्शन टाळण्यासाठी....
तसेच त्यामध्ये १ टेबलस्पून दही देखील टाकावे. दह्यामध्ये असणारे लॅक्टीक ॲसिड त्वचेवर छान चमक आणते.
हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि स्वच्छ, कोरड्या त्वचेवर लावा. त्यानंतर २० ते ३० मिनिटांनी हलक्या हाताने चोळून चेहरा धुवून टाका. लगेचच तुमच्या त्वचेत तुम्हाला खूप छान फरक जाणवेल. हा उपाय आठवड्यातून एकदा करावा.