थंडीचे दिवस आता सरत आले आहेत. पण तरीही हवेत गारवा असल्याने त्वचा कोरडी पडणं, तळपायांच्या भेगा वाढणं, थंड कोरड्या हवेमुळे त्वचा टॅन होणं, हे सगळे त्रास तर होतच आहेत. या सगळ्या समस्यांवर वेगवेगळे उपाय करण्यापेक्षा हा एकच सोपा उपाय पाहून घ्या. हा उपाय तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या कमी करण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल. यामध्ये आपण बॉडी स्क्रब कसं तयार करायचं, ते पाहणार आहोत (home made body scrub). शिवाय हा उपाय करण्यासाठी आपण घरातलेच सगळे साहित्य वापरणार आहोत (how to make body scrub at home). त्यामुळे स्वस्तात मस्त पद्धतीने त्वचेची काळजी कशी घ्यायची, ते पाहा...(best home remedies for removing tanning and dead skin)
घरच्याघरी बॉडी स्क्रब तयार करण्याची पद्धत
घरच्याघरी घरगुती साहित्य वापरून बॉडी स्क्रब कसं तयार करायचं, याची माहिती beautifulyouforever या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
कमाल.... २ आठवड्याच्या लेकीला घेऊन मिसेस वर्ल्ड स्पर्धेत गेलेली हन्ना आहे ८ मुलांची सुपरमॉम
हे स्क्रब तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा ग्लिसरीन, १ चमचा खोबरेल तेल, १ चमचा मध घ्या. त्यात चिमूटभर हळद आणि २ टेबलस्पून पिठी साखर घाला. यानंतर अर्धे लिंबू पिळा. सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर त्यात १ चमचा कॉफी पावडर टाका. हे झालं आपलं घरगुती स्क्रब तयार.
बॉडी स्क्रब वापरण्याचे फायदे
१. तळपायांच्या भेगा कमी करण्यासाठी आणि पायांना मॉईश्चराईज करण्यासाठी हे स्क्रब उपयुक्त ठरते.
२. त्वचेवरची डेड स्किन काढून टाकण्यासाठी फायदेशीर
निर्मला सीतारामन यांची कांथा वर्क टसर सिल्क साडी, निळ्याशार साडीची पाहा खासियत
३. संपूर्ण शरीरावरचे टॅनिंग कमी करून त्वचा चमकदार होण्यासाठी उपयुक्त.
४. हाताचे काेपरे, पायाचे घोटे किंवा गुडघे काळवंडले असतील तर हे स्क्रब लावून मसाज करा. टॅनिंग निघून जाईल.