हिवाळ्यात त्वचेच्या अनेक तक्रारी जाणवू लागतात. थंड हवेमुळे त्वचा काेरडी पडते. हिवाळ्यात पाणी कमी प्यायलं जातं. त्यामुळे मग डिहायड्रेशन होऊन त्वचेचा ड्रायनेस (dry skin) आणखीनच वाढू लागते. त्वचेवर सुरकुत्या दिसायला सुरुवात होते. काही जणींची त्वचा तर थंडीमुळे खूपच काळवंडून जाते. अशा त्वचेच्या सगळ्या तक्रारी दूर करण्यासाठी आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यासाठी हा एक खास प्रयोग करून बघा. आरोग्यासाठी गाजर खाणं गरजेचं असतं, हे तर आपण जाणतोच. आता त्याच पौष्टिक गाजराचं तेल (How to make carrot oil) करा आणि त्वचेवर लावा. बघा अवघ्या काही दिवसांमध्येच त्वचा कशी उजळून जाईल आणि चमकदार दिसेल.(Best skin care solution for winter)
कसं करायचं गाजराचं तेल?
१. यासाठी आपल्याला २ कप ऑलिव्ह ऑईल किंवा बदाम तेल, १ मध्यम आकाराचं गाजर आणि असेल तर लॅव्हेंडर इसेन्शियल ऑईल लागणार आहे.
Blouse Sleeves Designs: खास नव्या स्टाईलचं, ट्रेण्डी ब्लाउज शिवायचंय? बघा १० आकर्षक डिझाईन पॅटर्न
२. गाजर स्वच्छ धुवून घ्या, त्याची साले काढून ते किसून घ्या. त्यानंतर उन्हामध्ये ४ तास वाळवायला ठेवा.
३. नंतर एका काचेच्या बाटलीत ऑलिव्ह किंवा बदाम असं तुमच्या आवडीचं तेल घ्या. त्यात किसलेलं गाजर आणि असेल तर लॅव्हेंडर इसेन्शियल ऑईलचे काही थेंब टाका.
४. बाटलीचं झाकण लावून घ्या आणि ४ आठवडे ती बाटली तशीच ठेवून द्या. बाटली खूप उन्हात किंवा थंड भागात ठेवू नका. रुम टेम्परेचरला असावी. दिवसातून एक वेळा ती बाटली हलवा.
आता खा मॅगी मंचूरियन! एक सोपा, नवा प्रयोग आणि चटपटीत पदार्थ तयार, बघा झटपट रेसिपी
५. ४ आठवड्यानंतर बाटलीचा रंग बदललेला दिसेल. त्यानंतर ते तेल तुम्ही वापरू शकता. हे तेल पुढील ४ महिन्यांसाठी फ्रिजमध्ये साठवून ठेवता येते.
६. रोज रात्री झोपण्यापुर्वी थोडं तेल हातावर घ्या आणि त्याने चेहऱ्याला दिड ते दोन मिनिटांचा मसाज करा. सकाळी उठून चेहरा धुवून टाका.