हिवाळा सुरू झाला की सगळं अंगच उलतं.. म्हणजेच कोरडं पडतं. यात अनेक जणींचे तळपाय तर खूपच खराब होतात. टाचांवर एवढ्या जास्त भेगा दिसतात की अक्षरश: चारचौघांसमोर त्या दिसल्या तरी लाज वाटू लागते (How to recover cracked heel problem?). सारखं पायात सॉक्स घालून त्या भेगा लपवण्याचा प्रयत्न केला जातो. काही जणींच्या तर भेगा रक्ताळतात. जखमा होऊन खूप वेदनाही होतात. (Home made cream for cracked heel)
तळपायावरच्या भेगा कमी करण्यासाठी बऱ्याच जणी बाजारात मिळणारे वेगवेगळे क्रिम वापरून बघतात. पायांची जमेल तशी काळजीही घेतात. पण तरीही त्यात म्हणावा तसा फरक दिसून येत नाही.
विकतचा टोमॅटो सॉस जास्त प्रमाणात खाणं धोक्याचंच, म्हणून घरीच करा हेल्दी सॉस, बघा सोपी रेसिपी
तळपायांच्या भेगा काही कमी होत नाहीत. तुमचाही असाच अनुभव असेल तर आता हा दादी- नानीका नुस्का ट्राय करून पहा. हा एक सोपा घरगुती उपाय इन्स्टाग्रामच्या anjums.kitchen या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
तळपायाच्या भेगा कमी करण्यासाठी उपाय
१. हा उपाय करण्यासाठी आपल्याला मेणबत्ती, मोहरीचं तेल आणि ॲलोव्हेरा जेल अशा ३ गोष्टी लागणार आहेत.
थंडीमुळे त्वचा कोरडी पडली- सुरकुतलेली वाटतेय? या खास तेलाने करा मालिश, त्वचा दिसेल तुकतुकीत
२. सगळ्यात आधी गॅसवर एक कढई किंवा ॲल्यूमिनियमचे पातेले गरम करायला ठेवा. त्यात छोट्या छोट्या आकाराच्या असतील तर २ मेणबत्ती टाका.
३. मेणबत्त्या वितळायला सुरुवात झाली की त्यात दिड ते २ टेबलस्पून मोहरीचं तेल टाका.
४. मेणबत्त्या पुर्णपणे वितळल्यानंतर गॅस बंद करा. मिश्रण जेव्हा कोमट होईल तेव्हा त्यात १ टेबलस्पून ॲलोव्हेरा जेल टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या आणि एका काचेच्या बाटलीत भरून ठेवा. पुढचे ५ ते ६ दिवस तुम्ही ते वापरू शकता.
फॅटबर्न करण्यासाठी करिना कपूर बघा किती अवघड व्यायाम करतेय, व्हिडिओ व्हायरल....
५. दररोज रात्री झोपण्यापुर्वी पाय स्वच्छ धुवा. हे क्रिम तळपायांना लावा आणि त्यावर सॉक्स घाला. नियमित उपाय केल्यास ५ ते ६ दिवसांतच तळपाय मुलायम होतील.