Lokmat Sakhi >Beauty > भेगाळलेल्या टाचांसाठी खास होममेड क्रिम.. फक्त ४ गोष्टी वापरा, टाचा होतील मऊ- मुलायम

भेगाळलेल्या टाचांसाठी खास होममेड क्रिम.. फक्त ४ गोष्टी वापरा, टाचा होतील मऊ- मुलायम

How to Get Rid Of Cracked Heels: थंडी वाढली की तळपायावरच्या भेगा वाढतात. म्हणूनच त्यासाठी बघा हा एक उत्तम घरगुती उपाय (Home remedies). काही दिवसांतच भेगा कमी होतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2022 02:47 PM2022-12-17T14:47:05+5:302022-12-17T14:51:14+5:30

How to Get Rid Of Cracked Heels: थंडी वाढली की तळपायावरच्या भेगा वाढतात. म्हणूनच त्यासाठी बघा हा एक उत्तम घरगुती उपाय (Home remedies). काही दिवसांतच भेगा कमी होतील.

Home made cream for cracked heels, Home remedies for cracked heel | भेगाळलेल्या टाचांसाठी खास होममेड क्रिम.. फक्त ४ गोष्टी वापरा, टाचा होतील मऊ- मुलायम

भेगाळलेल्या टाचांसाठी खास होममेड क्रिम.. फक्त ४ गोष्टी वापरा, टाचा होतील मऊ- मुलायम

Highlightsबऱ्याच जणींना तर वेगवेगळे क्रिम लावूनही फरक पडत नाही. म्हणूनच आता हा एक सोपा घरगुती उपाय करून बघा

त्वचेसाठी हिवाळा ऋतू अतिशय त्रासदायक ठरतो. हिवाळा सुरू होताच त्वचेच्या अनेक समस्या डोकं वर काढतात. अंग कोरडं पडतं, केसांमधला कोंडा वाढतो. तळहाताची सालपटं निघू लागतात किंवा हात खूप रखरख होतात. आणि अशीच एक मोठी समस्या म्हणजे तळपायावरच्या भेगा. हिवाळ्यात हा त्रास अनेक जणींना होतो. बऱ्याच जणींना तर वेगवेगळे क्रिम लावूनही फरक पडत नाही. म्हणूनच आता हा एक सोपा घरगुती उपाय करून बघा (Home made cream for cracked heels). फक्त ४ गोष्टी वापरा आणि घरच्याघरी एक खास क्रिम तयार करा. 

तळपायाच्या भेगांसाठी होममेड क्रिम
हा उपाय इन्स्टाग्रामच्या priyasbeautytips या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
साहित्य
५ ते ६ टेबलस्पून मोहरीचं तेल

घोरण्याच्या सवयीमुळे चारचौघांत लाज वाटते? ३ सोपे उपाय करून बघा, घोरणं कमी होईल 
१ टेबलस्पून व्हॅसलिन
अर्धी मेणबत्ती
१ टीस्पून ग्लिसरीन

 

कसं करायचं क्रिम?
१. गॅसवर एक कढई तापायला ठेवा.

२. कढई गरम झाली की त्यात मोहरीचं तेल टाका.

नवरा असावा तर असा! मेकअपसाठी बायकोला मदत करणाऱ्या 'त्या' नवऱ्यावर अनेकजणी फिदा.. व्हिडिओ व्हायरल 

३. तेल गरम होत आलं की त्यात मेणबत्तीचा तुकडा टाका.

४. मेणबत्तीचा तुकडा वितळायला सुरुवात झाली की त्यात व्हॅसलिन घाला. 

५. व्हॅसलिन, मेणबत्ती वितळली की त्यानंतरच ग्लिसरिन टाका आणि सगळं मिश्रण हलवून घ्या.

६. साधारण ५ ते ६ मिनिटे हे मिश्रण व्यवस्थित तापवून घ्या. त्यानंतर गॅस बंद करा. आणि थोडं कोमट झालं की हे मिश्रण एखाद्या काचेच्या बाटलीत भरून ठेवा.

 

कसं लावायचं होममेड क्रिम?
१. रात्री झाेपण्यापुर्वी तळपाय स्वच्छ धुवून घ्या.

२. आपण तयार केलेलं क्रिम तळपायांना चोळून लावा.

अशा पद्धतीने मोबाईल पकडाल तर हमखास पाठदुखी- खांदेदुखी छळणार.. बघा मोबाईल पकडण्याच्या ३ चुकीच्या पद्धती

३. त्यानंतर पायामध्ये सॉक्स घालून ठेवा.

४. हे क्रिम लावल्यानंतर धुळीत जाणे टाळावे.  

Web Title: Home made cream for cracked heels, Home remedies for cracked heel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.