त्वचेसाठी हिवाळा ऋतू अतिशय त्रासदायक ठरतो. हिवाळा सुरू होताच त्वचेच्या अनेक समस्या डोकं वर काढतात. अंग कोरडं पडतं, केसांमधला कोंडा वाढतो. तळहाताची सालपटं निघू लागतात किंवा हात खूप रखरख होतात. आणि अशीच एक मोठी समस्या म्हणजे तळपायावरच्या भेगा. हिवाळ्यात हा त्रास अनेक जणींना होतो. बऱ्याच जणींना तर वेगवेगळे क्रिम लावूनही फरक पडत नाही. म्हणूनच आता हा एक सोपा घरगुती उपाय करून बघा (Home made cream for cracked heels). फक्त ४ गोष्टी वापरा आणि घरच्याघरी एक खास क्रिम तयार करा.
तळपायाच्या भेगांसाठी होममेड क्रिमहा उपाय इन्स्टाग्रामच्या priyasbeautytips या पेजवर शेअर करण्यात आला आहे.साहित्य५ ते ६ टेबलस्पून मोहरीचं तेल
घोरण्याच्या सवयीमुळे चारचौघांत लाज वाटते? ३ सोपे उपाय करून बघा, घोरणं कमी होईल १ टेबलस्पून व्हॅसलिनअर्धी मेणबत्ती१ टीस्पून ग्लिसरीन
कसं करायचं क्रिम?१. गॅसवर एक कढई तापायला ठेवा.
२. कढई गरम झाली की त्यात मोहरीचं तेल टाका.
नवरा असावा तर असा! मेकअपसाठी बायकोला मदत करणाऱ्या 'त्या' नवऱ्यावर अनेकजणी फिदा.. व्हिडिओ व्हायरल
३. तेल गरम होत आलं की त्यात मेणबत्तीचा तुकडा टाका.
४. मेणबत्तीचा तुकडा वितळायला सुरुवात झाली की त्यात व्हॅसलिन घाला.
५. व्हॅसलिन, मेणबत्ती वितळली की त्यानंतरच ग्लिसरिन टाका आणि सगळं मिश्रण हलवून घ्या.
६. साधारण ५ ते ६ मिनिटे हे मिश्रण व्यवस्थित तापवून घ्या. त्यानंतर गॅस बंद करा. आणि थोडं कोमट झालं की हे मिश्रण एखाद्या काचेच्या बाटलीत भरून ठेवा.
कसं लावायचं होममेड क्रिम?१. रात्री झाेपण्यापुर्वी तळपाय स्वच्छ धुवून घ्या.
२. आपण तयार केलेलं क्रिम तळपायांना चोळून लावा.
३. त्यानंतर पायामध्ये सॉक्स घालून ठेवा.
४. हे क्रिम लावल्यानंतर धुळीत जाणे टाळावे.