Join us  

दिवाळीपर्यंत बघा कसा चमकेल चेहरा! त्यासाठी दिवसातून फक्त २ वेळा 'हे' होममेड क्रिम लावा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2023 1:53 PM

Skin Care Tips For Diwali: दिवाळीपर्यंत चेहऱ्यावर खूप छान ग्लो येईल. त्यासाठी फक्त हा एक सोपा घरगुती उपाय रोज करा (How to make skin glow)...

ठळक मुद्देयामध्ये आपण काही साहित्य वापरून एक होममेड क्रीम तयार करणार आहोत

दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. आता दिवाळी म्हटलं की सजणं- नटणं आलंच. नटायचं- सजायचं, सुंदर साड्या नेसायच्या असल्या की चेहरा तर चांगला हवाच ना... म्हणूनच चेहऱ्याचं सौंदर्य उजळविण्यासाठी हा एक घरगुती उपाय करून पाहा. पार्लरमध्ये जाणं होत नसेल किंवा मग फेशियल, क्लिनअप करण्यासाठी खूप पैसे घालविण्याची इच्छा नसेल तर हा एक खूप छान उपाय आहे. अगदी स्वस्तात मस्त... यामध्ये आपण काही साहित्य वापरून एक होममेड क्रीम तयार करणार आहोत (Home made cream for glowing skin). हा उपाय इन्स्टाग्रामच्या anamikaversatile या पेजवर शेअर करण्यात आला आहे.( Glowing radiant skin in just 8 days)

 

चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी घरगुती उपाय

साहित्य

२ टेबलस्पून गुलाब जल

७ ते ८ केशर काड्या

तब्बल दिड लाखांचा चमचमता अनारकली ड्रेस! बघा परिणिती चोप्राच्या पहिल्या करवा चौथचा थाट

१ टेबल स्पून बदाम तेल

२ टेबलस्पून ॲलोव्हेरा जेल

२ व्हिटॅमिन ई कॅप्सूल

 

कृती

१. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये गुलाब जल घ्या. त्यात केशराच्या काड्या साधारण ५ ते ६ तास भिजायला ठेवा.

२. या पाण्यात केशराचा रंग चांगला उतरेल. त्यानंतर त्या मिश्रणात बदाम तेल, ॲलोव्हेरा जेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल टाका. 

सतत थकवा येतो, एनर्जी पुरतच नाही? रोज सकाळी प्या हे १ एनर्जी ड्रिंक, दिवसभर वाटेल फ्रेश, थकवा गायब

३. सगळं साहित्य टाकल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. त्याचा रंग हलकासा बदलेपर्यंत आणि मिश्रण थोडेसे घट्ट होईपर्यंत हलवावे.

४. त्यानंतर हे क्रिम एका एअरटाईट डबीमध्ये भरून ठेवा.

५. रात्री झोपण्यापुर्वी तर हे क्रिम चेहऱ्याला लावाच, पण सकाळी चेहरा धुतल्यानंतर मॉईश्चरायझर म्हणूनही लावा. 

६. ८ दिवसांतच खूप चांगला परिणाम दिसून येईल. 

 

टॅग्स :दिवाळी 2023ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी