Join us  

त्वचा निस्तेज झाली, काळवंडली? घरच्या घरी ५ मिनिटांत करा स्क्रब, त्वचा राहील कायम चमकदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2023 11:52 AM

Home Made Easy Scrub To Brighten The Skin : त्वचा कायम चमकदार आणि चांगली दिसावी यासाठी घरच्या घरी स्क्रब कसे तयार करायचे पाहूया...

ठळक मुद्देत्वचेवरचा मळ, काळेपणा निघून जाण्यास याचा चांगला उपयोग होईल. घरात उपलब्ध असणाऱ्या कमीत कमी पदार्थांपासून हा स्क्रब तयार होतो.

थंडीच्या दिवसांत आपली त्वचा खूप कोरडी पडते. इतकंच नाही तर कधी उन्हात फिरल्यामुळे तर कधी प्रदूषण आणि आणखी काही कारणांनी आपली त्वचा काळवंडते आणि निस्तेज होते. आपण नियमितपणे त्वचेची म्हणावी तशी काळजी घेत नाही. त्वचा वेळच्या वेळी मॉईश्चराईज करणे किंवा सनस्क्रीन वापरणे. त्वचेचे टॅनिंग जाण्यासाठी एखादा स्क्रब वापरणे या गोष्टी आपण नियमितपणे करत नाही. मग एकाएकी आपल्याला त्वचा खराब झाल्याचे जाणवते. अशावेळी बराच उशीर झालेला असल्याने पार्लरमध्ये जाण्याशिवाय पर्याय नसतो (Home Made Easy Scrub To Brighten The Skin). 

मग पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट करुन आपण त्वचेचा हा काळवंडलेपणा किंवा निस्तेजपणा कमी करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. अशावेळी घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने केलेले उपचार सौंदर्यासाठी कधीही फायदेशीर ठरतात. तसेच हे उपाय केल्याने कोणतेही साईड इफेक्ट होण्याचीही शक्यता नसते. कमीत कमी खर्चात हे उपाय होत असल्याने पैशांचीही बचत होते. घरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून अगदी ५ मिनीटांत हे स्क्रब तयार होते आणि आपल्याला हवे तेव्हा वापरता येते. आता त्वचा कायम चमकदार आणि चांगली दिसावी यासाठी घरच्या घरी स्क्रब कसे तयार करायचे पाहूया...

(Image : Google)

घरी स्क्रब तयार करायच्या स्टेप्स..

१. एका बाऊलमध्ये २ चमचे साखर घ्या.

२. त्यात १ चमचा मध घाला.

३. १ चमचा खोबरेल तेल घाला.

४. २ चमचे लिक्विड बॉडी सोप घाला.

५. हे सगळे चांगले एकत्र करा आणि एका डबीत भरुन ठेवा. 

६. आपले हात, चेहरा, मान पाय हे फार कांळवंडले आहेत असे वाटेल तेव्हा हे मिश्रण त्या भागावर लावा.

७. त्यानंतर हळूवार हाताने स्क्रब करा. 

८. यामुळे त्वचा चमकदार, नितळ दिसेल. त्वचेवरचा मळ, काळेपणा निघून जाण्यास याचा चांगला उपयोग होईल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीमेकअप टिप्सहोम रेमेडी