Join us  

डार्क सर्कल्समुळे चेहरा डल वाटतोय? कॉफीमध्ये 'हा' पदार्थ मिसळून लावा, चेहरा दिसेल उजळदार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2023 6:07 PM

Home Made Eye Mask for Dark Circles : टीव्ही किंवा कॉम्प्युटर स्क्रीनकडे जास्त वेळ टक लावून पाहिल्याने तुमच्या डोळ्याभोवती रक्तवाहिन्या पसरतात. यामुळे तुमच्या डोळ्याभोवतीची त्वचा काळी पडते.

रोजची कामाची दगदग,  खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणं, डार्क सर्कल्स खूपच कॉमन झालंय. डार्क सर्कल्समुळे तुमच्याही चेहऱ्याचा लूक बिघडला असेल तर काही सोप्या टिप्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. (Skin Care Tips)  डोळ्यांखालची काळी वर्तूळ काही घालवण्यासाठी महागड्या क्रिम्स, जेल वापरण्यापेक्षा तुम्ही २ रुपयांची कॉफी वापरून डार्क सर्कल्सना कायमचं घालवू शकता. (Home remedy for dark cirle)  

सुरकुत्या रिमूव्हर मास्क बनवण्यासाठी साहित्य

कॉफी पावडर - १ टिस्पून

हल्दी - १/४ टीस्पून

मध - १ टीस्पून

बटाट्याचा रस - १ टीस्पून 

डार्क सर्कल्स का येतात (Causes of Dark Circles)

१) उशीरा झोपणे, जास्त झोप किंवा जास्त थकवा यामुळे काळी वर्तुळे उद्भवू शकतात. झोपेच्या कमतरतेमुळे तुमची त्वचा निस्तेज होते. परिणामी त्वचेवर काळी वर्तुळे दिसू लागतात. 

२) डार्क सर्कल्सचं आणखी एक कारण म्हणजे नैसर्गिक वृद्धत्व. जसजसे तुमचे वय वाढत जाते तसतशी तुमच्या डोळ्यांखालील त्वचा पातळ होत जाते.

३) टीव्ही किंवा कॉम्प्युटर स्क्रीनकडे जास्त वेळ टक लावून पाहिल्याने तुमच्या डोळ्याभोवती रक्तवाहिन्या पसरतात. यामुळे तुमच्या डोळ्याभोवतीची त्वचा काळी पडते.

४) जास्त सूर्यप्रकाशामुळे मेलेनिनचे जास्त उत्पादन होते. जास्त सूर्यप्रकाशामुळे तुमच्या डोळ्याभोवती डार्क सर्कल निर्माण होते. यामुळे डोळ्यांभोवतीची त्वचा काळी पडते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीआरोग्य