Join us  

चेहऱ्यावर अनावश्यक केस, वैतागलात? लावा घरगुती फेसपॅक, चेहरा दिसेल चमकदार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2022 4:37 PM

Home Made Facial hair Removal Face pack : घरच्या घरी एखाद्या सोप्या उपायाने हे केस काढता आले तर त्याचा निश्चितच उपयोग होऊ शकतो.

ठळक मुद्देएकदोन वेळा हा प्रयोग केला आणि चेहऱ्यावरचे केस गेले असं होणार नाही. त्यामुळे केस जाण्यासाठी आपल्याला काही काळ हीच प्रक्रिया करत राहावी लागेल. खूप जास्त वेळ हा पॅक चेहऱ्यावर ठेवू नका, नाहीतर पॅक काढताना चेहऱ्यावर रॅशेस येऊ शकतात. 

आपला चेहरा नितळ, चमकदार आणि सतेज असावा अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. मात्र काही ना काही कारणाने चेहऱ्यावर फोड येणे, पिंपल्स येणे, डाग पडणे अशा समस्या उद्भवतात. इतकेच नाही तर चेहऱ्यावर अनावश्यक केस असल्यानेही अनेकदा आपल्या सौंदर्यात बाधा येते. कधी आनुवंशिकतेमुळे तर कधी हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे महिलांमध्येही ओठावर, गालांवर, हनुवटीवर केस येतात. हे केस कालांतराने इतके वाढतात की ते काढण्यासाठी पार्लरमध्ये जावे लागते. मग थ्रेडींग, व्हॅक्सिंग किंवा कधी चक्क लेझर ट्रीटमेंटने हे केस काढावे लागतात. चारचौघात एखाद्या महिलेच्या चेहऱ्यावर केस दिसले तर तुला मिशी आहे किंवा चक्क तुला दाढी आली असं म्हणायलाही लोक कमी करत नाहीत. अशावेळी ओशाळण्यापेक्षा आपण त्याचा बंदोबस्त करतो. पण सतत पार्लरमध्ये जाणे शक्य होतेच असे नाही. अशावेळी घरच्या घरी एखाद्या सोप्या उपायाने हे केस काढता आले तर त्याचा निश्चितच उपयोग होऊ शकतो. पाहूयात घरच्या घरी करता येईल असा फेसपॅक (Home Made Facial hair Removal Face pack)...

(Image : Google)

साहित्य -

१. हळद - १ चमचा

२. बेसन पीठ - १ चमचा 

३. गव्हाचे पीठ - १ चमचा 

४. मोहरीचे तेल - १ चमचा 

५. मध - १ चमचा 

६. पाणी - आवश्यकतेनुसार

कृती - 

१. एक स्वच्छ बाऊल घेऊन त्यामध्ये बेसन, हळद, गव्हाचे पीठ, मध, तेल एकत्र करा. 

२. यामध्ये आवश्यकतेनुसार एकजीव होईल इतकेच पाणी घाला. 

३. हे घट्टसर मिश्रण ओठाच्या वरच्या बाजूला आणि हनुवटीवर लावा. 

(Image : Google)

४. गालावर किंवा चेहऱ्याच्या इतर भागावर हे मिश्रण लावायचे असल्यास थोडी पातळसर पेस्ट बनवा.

५. २० मिनीट हे मिश्रण चेहऱ्यावर तसेच ठेवा, त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा, चेहरा धुताना उलट्या दिशेने फेसपॅक काढा म्हणजे चेहऱ्यावरचे केस निघण्यास मदत होईल.

६. आठवड्यातून दोन वेळा किमान एकदा ही प्रक्रिया नक्की करा, त्यामुळे चेहऱ्यावरचे केस कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

७. एकदोन वेळा हा प्रयोग केला आणि चेहऱ्यावरचे केस गेले असं होणार नाही. त्यामुळे केस जाण्यासाठी आपल्याला काही काळ हीच प्रक्रिया करत राहावी लागेल. 

८. तुम्हाला एखाद्या गोष्टीची अॅलर्जी असेल तर चेहऱ्याला त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे हाताच्या एका कोपऱ्यात या पॅकची पॅच टेस्ट घ्या आणि मगच पूर्ण चेहऱ्यावर हा पॅक लावा. 

९. यामध्ये कणीक, मध यांसारखे पदार्थ असल्याने हा पॅक चेहऱ्याला घट्ट बसण्याची शक्यता असते. त्यामुळे खूप जास्त वेळ हा पॅक चेहऱ्यावर ठेवू नका, नाहीतर पॅक काढताना चेहऱ्यावर रॅशेस येऊ शकतात.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी