Join us  

केस अजिबातच वाढत नाहीत? लावा लसूण तेल, इतके भराभर वाढतील की वारंवार कापावे लागतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2024 9:02 AM

Home Made Garlic Oil For Fast Hair Growth: केसांना अजिबातच वाढ नसेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. केसांची वाढ खूप पटापट होईल. (hair care tips for healthy hair)

ठळक मुद्देलसूण तेल लावल्याने केसांना नेमका कसा फायदा होतो आणि लसूण तेल घरच्याघरी एकदम सोप्या पद्धतीने कसं करायचं ते आता पाहूया..

बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की केस अजिबातच वाढत नाहीत. अगदी महिनोंमहिने होतात तरी केसांच्या लांबीमध्ये इंचभरही वाढ झालेली नसते. ज्याप्रमाणे लहान मुलांच्या वाढीसाठी त्यांना उत्तम आहाराची गरज असते, तसंच काहीसं केसांचंही असतं. म्हणूनच आता केसांना योग्य पोषण देण्यासाठी लसूण तेलाचा वापर करून पाहा. लसूणामध्ये असे अनेक गुणधर्म आहेत, जे केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम ठरतात (how to make garlic oil for hair at home). लसूण तेल लावल्याने केसांना नेमका कसा फायदा होतो (home made garlic oil for fast hair growth) आणि लसूण तेल घरच्याघरी एकदम सोप्या पद्धतीने कसं करायचं ते आता पाहूया..(hair care tips for healthy hair)

 

लसूणाचे तेल केसांसाठी वापरल्याने होणारे फायदे

१. लसूणामध्ये सल्फर आणि सेलेनियम हे दोन्ही घटक भरपूर प्रमाणात असतात. हे दोन्ही घटक केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त आहेत. त्यांच्यामुळे केसांची मुळं पक्की होण्यास मदत होते.

नॉन स्टिक भांडी चुकीच्या पद्धतीने वापरल्यास टेफ्लॉन फ्लू होण्याचा धोका! बघा या आजाराची लक्षणं 

२. लसूणामध्ये नैसर्गिकरित्याच ॲण्टीमायक्रोबियल गुणधर्म असतात. त्यामुळे केसांमधला कोंडा कमी करण्यासाठीही लसूण तेल उपयुक्त ठरतं. केसांमधला कोंडा कमी झाला की आपोआपच केसांचं आरोग्य सुधारतं.

३. लसूणामध्ये असणारे काही घटक रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यास मदत करते. त्यामुळे केसांच्या मुळांना चांगल्या प्रमाणात ऑक्सिजन मिळून ते मजबूत होण्यास मदत होते. केसांची मुळं मजबूत झाली की आपोआपच केस गळण्याचं प्रमाण कमी होतं. 

 

केसांसाठी लसूण तेल कसं तयार करायचं?

लसणाचं तेल तयार करण्यासाठी आपल्याला १ वाटी खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईल, १० ते १२ लसूण पाकळ्या हे दोनच पदार्थ लागणार आहेत.

सगळ्यात आधी लसूण सोलून घ्या आणि तो बारीक ठेचून घ्या.

मेदूवड्यात मधोमध परफेक्ट छिद्र पाडताच येत नाही? १ सोपी ट्रिक-करा गोल गरगरीत मेदूवडे

आता एका पातेल्यात तेल घ्या. त्यामध्ये ठेचलेला लसूण टाका आणि हे तेल गॅसवर गरम करायला ठेवा.

तेल मंद आचेवर गरम करा. ते उकळेपर्यंत तापवू नका. तेल चांगलं गरम झालं की गॅस बंद करा.

 

तेल थंड झालं की ते गाळून घ्या आणि एखाद्या काचेच्या बरणीत भरून ठेवा. थेट सुर्यप्रकाश या तेलावर पडेल अशा पद्धतीने ते ठेवू नका.

लिंबू लावून घरातल्या ५ वस्तू कधीच स्वच्छ करू नये! वरवर चकाचक दिसल्या तरी लगेच खराब होतील

आठवड्यातून दोन वेळा या तेलाने डोक्याला मालिश करा त्यानंतर २ ते ३ तासांनी केस धुवून टाका. रात्रभर हे तेल डोक्याला राहू दिलं तरी चालेल. तयार केलेलं तेल महिन्याभरात संपवून टाका. कारण त्यानंतर त्यातले गुणधर्म कमी होत जातात.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी