Lokmat Sakhi >Beauty > केस सारखे चिपचिपीत होतात? सोपा घरगुती उपाय, केस होतील शायनी- सिल्की

केस सारखे चिपचिपीत होतात? सोपा घरगुती उपाय, केस होतील शायनी- सिल्की

Hair Care Tips For Shiny-Silky Hair: काहीही करा केस काही चमकदार, सिल्की दिसतच नाहीत. असा तुमचाही प्रॉब्लेम असेल तर हे काही घरगुती उपाय (home remedies) करून बघा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2022 02:16 PM2022-09-23T14:16:59+5:302022-09-23T14:17:33+5:30

Hair Care Tips For Shiny-Silky Hair: काहीही करा केस काही चमकदार, सिल्की दिसतच नाहीत. असा तुमचाही प्रॉब्लेम असेल तर हे काही घरगुती उपाय (home remedies) करून बघा..

Home made hair gel for oily, freezy, sticky hair, How to make hair silky and shiny? | केस सारखे चिपचिपीत होतात? सोपा घरगुती उपाय, केस होतील शायनी- सिल्की

केस सारखे चिपचिपीत होतात? सोपा घरगुती उपाय, केस होतील शायनी- सिल्की

Highlightsकेस चमकदार, सिल्की आणि शायनी दिसतील. शिवाय त्यांना उत्तम पोषणही मिळेल.

काही जणी त्यांच्या केसांच्या बाबतीत नेहमीच हैराण असतात. कारण त्यांना जसे पाहिजे असतात, त्या पद्धतीने त्यांचे केस कधीच सेट होत नाहीत. केस कितीवेळा जरी धुतले, व्यवस्थित कंंडिशनिंग केले, तरी ते कोरडे, निस्तेज (home remedies for dry and dull hair) दिसतात. उलट बऱ्याचदा तर उलटच होते. केस चमकदार होण्याऐवजी वारंवार हेअर वॉश केल्यामुळे त्यांच्यातलं मॉईश्चर कमी होऊन ते अधिकच कोरडे दिसायला लागतात. अशा केसांसाठी काही घरगुती उपाय नक्कीच करता येतात. जेणेकरून केस चमकदार, सिल्की आणि शायनी (hair gel for oily, freezy hair) दिसतील. शिवाय त्यांना उत्तम पोषणही मिळेल. केस चमकदार होण्यासाठी नेमकं काय करायचं, याचा उपाय zapseries55 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

 

केस चमकदार होण्यासाठी उपाय
हा उपाय करण्यासाठी आपल्या घरात अगदी सहजपणे आढळून येतील, अशाच ४ वस्तू वापरायच्या आहेत. त्यासाठी खूप काही वेगळं करण्याची गरज नाही. 
साहित्य
१ टीस्पून कोरफडीचा गर किंवा अलोव्हेरा जेल
१ टीस्पून कॉफी पावडर
१ टीस्पून तुमचा नेहमीचा शॅम्पू
१ व्हिटॅमिन ई कॅप्सूल

 

कसं वापरायचं जेल?
१. हा उपाय करण्यासाठी वरील सगळे साहित्य एक वाटीमध्ये एकत्र करा.

२. सगळे मिश्रण एकत्र कालवून घेतले की झालं हेअर जेल तयार. ते जेल केसांच्या लांबीवर व्यवस्थित लावून घ्या.

३. आपण ज्याप्रमाणे कण्डीशनर लावतो, त्याप्रमाणे हे मिश्रण केसांवर लावावे.

४. साधारण एखाद्या तासाने केस धुवून टाका.

५. आठवड्यातून 2 वेळा हा उपाय केल्यास अधिक चांगला परिणाम दिसून येईल.

६. व्हिटॅमिन ई, कॉफी पावडर आणि कोरफडीचा गर यांच्यामुळे केसांना पुरेपूर पोषण मिळेल आणि ते चमकदार तर होतीलच, पण त्यांचं आरोग्य सुधारण्यासही मदत होईल. 

 

Web Title: Home made hair gel for oily, freezy, sticky hair, How to make hair silky and shiny?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.