हल्ली केस गळण्याची समस्या अनेकांना भेडसावते आहे. कमी वयातच डोक्यावर टक्कल पडलेल्या किंवा हेअरलाईन मागे जाऊन कपाळ मोठं दिसू लागलेल्या अनेक व्यक्ती आपण पाहतो. ज्या दिवशी महिला केस धुतात त्या दिवशी तर बाथरुममध्ये किंवा केस पुसले त्या खोलीमध्ये फरशीवर सगळीकडे केसच केस पडलेले दिसतात (how to get rid of hair loss?). केस गळण्याचं प्रमाण एवढं वाढलं असेल तर अगदी तातडीने हा एक घरगुती उपाय करून पाहा (best home remedies for strong hair). हा उपाय आठवड्यातून दोन वेळा केल्यास अगदी आठवडाभरातच केस गळण्याचं प्रमाण बरंच कमी झाल्याचं जाणवेल.(home made hair mask for controlling hair fall)
केस गळणं कमी करण्यासाठी उपाय
केस गळणं कमी करण्यासाठी कोणता घरगुती उपाय करावा, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी dr.deepikarana या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
दसरा- दिवाळीत दारासाठी तोरण कसं तयार करावं? ५ सुंदर डिझाईन्स, करायला सोपे- दिसायला आकर्षक
हा उपाय करण्यासाठी आपल्याला १ टेबलस्पून मेथी दाणे, १ टेबलस्पून दही, १ टेबलस्पून कॅस्टर ऑईल आणि १ टेबलस्पून कोरफडीच गर लागणार आहे. कोरफडीच्या गरऐवजी बाजारात विकत मिळणारं ॲलोव्हेरा जेल वापरलं तरी चालेल.
रात्री झोपण्यापुर्वी एक ग्लास पाणी घ्या आणि त्यामध्ये मेथी दाणे रात्रभर भिजत घाला.
सकाळी उठल्यानंतर ते पाणी गाळून घ्या आणि मेथी दाणे मिक्सरमध्ये फिरवून त्याची बारीक पेस्ट करून घ्या.
एका वाटीमध्ये मेथीदाण्याची पेस्ट, दही, कॅस्टर ऑईल, ॲलोव्हेरा जेल असं सगळं घ्या आणि व्यवस्थित कालवून एकजीव करून घ्या.
त्यानंतर हा लेप तुमच्या केसांच्या मुळांपासून ते शेवटच्या टोकापर्यंत एकसारखा लावून घ्या. ४० ते ४५ मिनिटे हा लेप तुमच्या केसांवर तसाच राहू द्या.
बाळासाठी महागडी फूड पावडर कशाला हवी? ‘हा' घरगुती पौष्टिक पदार्थ खाऊ घाला- बघा रेसिपी
त्यानंतर सुरुवातीला तो साध्या पाण्याने धुवून टाका आणि त्यानंतर कोणताही माईल्ड हर्बल शाम्पू लावून केस धुवून घ्या. हा उपाय नियमितपणे केल्यास काही दिवसांतच केसांची मुळं पक्की होतात. त्यामुळे त्यांचं गळण्याचं प्रमाण आपोआपच कमी होऊन केस दाट- लांब होण्यास मदत होते.