Lokmat Sakhi >Beauty > केसातला कोंडा काही केल्या कमीच होत नाही? घरच्याघरी १ सोपा उपाय, कोंडा होईल कमी

केसातला कोंडा काही केल्या कमीच होत नाही? घरच्याघरी १ सोपा उपाय, कोंडा होईल कमी

Home made Hair mask for Dandruff Problem : बाजारात मिळणारी महागडी उत्पादने वापरण्यापेक्षा घरच्या घरी काही उपाय केल्यास त्याचा फायदा होतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2022 01:12 PM2022-11-21T13:12:37+5:302022-11-22T16:28:47+5:30

Home made Hair mask for Dandruff Problem : बाजारात मिळणारी महागडी उत्पादने वापरण्यापेक्षा घरच्या घरी काही उपाय केल्यास त्याचा फायदा होतो.

Home made Hair mask for Dandruff Problem : Does not reduce the amount of Dandruff? 1 simple remedy at home... Dandruff will be reduced | केसातला कोंडा काही केल्या कमीच होत नाही? घरच्याघरी १ सोपा उपाय, कोंडा होईल कमी

केसातला कोंडा काही केल्या कमीच होत नाही? घरच्याघरी १ सोपा उपाय, कोंडा होईल कमी

Highlightsरासायनिक घटक वापरुन केसांचा पोत बिघडवण्यापेक्षा नैसर्गिक घटकांनी कोंड्याची समस्या घालवता येतेदही, कडीपत्ता आणि आलं घरात सहज उपलब्ध असणारे अतिशय फायदेशीर घटक असून केसांच्या आरोग्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो

केसांतला कोंडा ही सर्व वयोगटातील मुला-मुलींची एक मुख्य समस्या असते. केसांचे पुरेसे पोषण न झाल्याने किंवा कोरडेपणामुळे कोंडा होतो. कधी ही समस्या इतकी वाढते की डोक्यात कोंड्याचे फोड येणे, खाज येणे आणि अगदी कपड्यांवर कोंडा पडणे अशा सगळ्या समस्या निर्माण होतात. हा कोंडा कमी व्हावा म्हणून आपण कधी केसांना तेलाने खूप मसाज करतो तर कधी शाम्पू-कंडीशनर बदलून पाहतो. तरीही म्हणावा तितका फरक दिसतच नाही. केसांत कोंडा असेल की आपल्यालाही केस कितीही स्वच्छ केले तरी अस्वच्छ असल्यासारखे वाटते. अशावेळी बाजारात मिळणारी महागडी उत्पादने वापरण्यापेक्षा घरच्या घरी काही उपाय केल्यास त्याचा फायदा होण्याची शक्यता असते (Home made Hair mask for Dandruff Problem). 

त्वचेवर सतत केमिकल्सचा मारा करण्यापेक्षा नैसर्गिक उपाय अनेकदा फायदेशीर ठरतात. आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार यांनी नुकताच कोंड्याच्या समस्येसाठी एक अतिशय सोपा उपाय सांगितला आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून त्या आपल्या चाहत्यांना कायम महत्त्वाची माहिती देत असतात. यावेळी त्यांनी कोंडा कमी करण्यासाठी घरच्या घरी सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून हेअर मास्क कसा तयार करायचा आणि तो कसा लावायचा याबाबत माहिती शेअर केली आहे. पाहूया हा हेअर मास्क कसा तयार करायचा आणि त्याचे केसांसाठी काय फायदे होतात. 

मास्क कसा तयार करायचा?

१. १ चमचा दही, ५ ते ७ कडीपत्त्याच्या पानांचा चुरा आणि २ इंचाच्या आल्याची पेस्ट किंवा किसलेले हे सगळे एकत्र करायचे.

२. हे मिश्रण ३० मिनीटांसाठी बाजूला ठेवायचे. 

३. त्यानंतर केसांच्या मुळांना हे मिश्रण लावून ३० मिनीटे ठेवायचे.

४. त्यानंतर केस हलक्या शाम्पूने स्वच्छ धुवायचे. 


फायदे

१. सलग ३ आठवडे आठवड्यातून २ वेळा हा उपाय केल्यास केसांतला कोंडा दूर होण्यास याचा उपयोग होतो.

२. इतकेच नाही तर केस कोरडे आणि रुक्ष झाले असतील तर ते सिल्की आणि शायनी होण्यासाठीही हा मास्क उपयुक्त ठरतो. 

३. दह्यामध्ये प्रोटीन असल्याने केसांचे पोषण होऊन त्यांची वाढ होण्यास दही फायदेशीर ठरते. त्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 

४. कडीपत्त्यामध्ये अँटी फंगल गुणधर्म असल्याने केसांतला कोंडा आणि खाज कमी होण्यास त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. 

५. आल्यामध्ये अँटी इन्फ्लमेटरी, अँटी सेप्टीक आणि अँटी बॅक्टेरीयल गुणधर्म असतात. या गुणधर्मांमुळे मृत त्वचेची निर्मिती रोखली जाते. तसेच कोंड्यामुळे केस गळण्याची समस्या असेल तर त्यापासूनही संरक्षण होते.  

Web Title: Home made Hair mask for Dandruff Problem : Does not reduce the amount of Dandruff? 1 simple remedy at home... Dandruff will be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.