Join us  

लाँग ॲण्ड स्ट्राँग केसांसाठी बनवा घरच्या घरीच खास हेअरमास्क; वापरा फक्त ५ गोष्टी, केस वाढतील झरझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 1:12 PM

Hair care tips: केस मजबूत होऊन त्यांची चांगली वाढ होण्यासाठी करून बघा हा हेअरमास्क... घरच्या घरी आणि ते ही अगदी सोप्या पद्धतीने...

ठळक मुद्दे ज्याप्रमाणे आपल्या त्वचेला आपण वेगवेगळे लेप लावून पोषण देतो, त्याप्रमाणेच आता केसांसाठीही हा होम मेड हेअर मास्क तयार करून बघा.

केसांची समस्या सध्या खूपच वाढली आहे. धुळ, प्रदुषण, ऊन आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपली बदललेली जीवनशैली आणि खाण्या- पिण्याच्या चुकीच्या सवयी. या सगळ्या गोष्टींमुळे केसांना हवं तसं पोषण मिळत नाही. केसांच्या वाढीसाठी (beauty tips for long and strong hair) आणि मजबुतीसाठी आवश्यक असणारी पोषणमुल्ये त्यांना न मिळाल्यामुळे ते कुमकुवत होतात आणि लगेचच गळून जातात. त्यामुळेच तर आजघडीला दर १० मुलींपैकी ८ मुली केस खूप जास्त गळतात, अशी तक्रार करणाऱ्या आहेत. 

 

केसांची ही समस्या जर कमी करायची असेल तर त्यांना पोषण देणं गरजेचं आहे. हे पोषण जर आपल्या आहारातून मिळत नसेल, तर त्यांना ते वरून द्यावं लागणार. ज्याप्रमाणे आपल्या त्वचेला आपण वेगवेगळे लेप लावून पोषण देतो, त्याप्रमाणेच आता केसांसाठीही हा होम मेड हेअर मास्क तयार करून बघा. हा हेअर मास्क कसा तयार करायचा याविषयीची माहिती Ruchita Ghag यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. दोन- तीन दिवसांतच हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला असून लांब आणि मजबूत केस हवे असतील, तर हा हेअरमास्क उपयुक्त ठरेल, असं त्यांचं म्हणणं आहे...

 

कसा करायचा केसांसाठी हेअरमास्क... (how to make home made hair mask)- केसांसाठी हा होम मेड हेअरमास्क तयार करायचा असेल तर आपल्याला फक्त ५ गोष्टींची गरज आहे.- एक छोटी वाटी भरून ॲलोव्हेरा जेल, १ टेबलस्पून कॅस्टर ऑईल, १ टेबल स्पून बदाम तेल, १ टेबलस्पून खोबरेल तेल आणि व्हिटॅमिन ई ची एक कॅप्सूल एवढं साहित्य आपल्याला हेअर मास्क करण्यासाठी लागणार आहे.- हेअर मास्क करण्यासाठी एका बाऊलमध्ये वरील सगळं साहित्य एकत्र करा. व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल सगळ्यात शेवटी फोडून टाका. 

नेहमीच तरूण, उत्साही रहायचंय ना? मग हे ४ पदार्थ तुमच्या आहारात असायलाच हवेत - सगळं मिश्रण बोटांनी किंवा चमच्याने व्यवस्थित फेटून घ्या आणि जेव्हा त्याचा रंग थोडा सफेद होईल तेव्हा हा हेअर मास्क केसांच्या मुळाशी लावा.

 

या गोष्टीही लक्षात घ्या... - हा हेअर मास्क तुम्ही केसांच्या मुळांशी तसेच केसांच्या लांबीवरही लावू शकता.- हेअर मास्क लावल्यानंतर अर्धा ते एक तास तो केसांवर तसाच राहू द्या.- त्यानंतर केस नेहमीप्रमाणे शाम्पू करून धुवून टाका.

DIY: घरच्याघरी बनवा हेअर स्पा क्रिम; हव्या फक्त ४ गोष्टी, कोरडे केस होतील मऊ-मस्त- भुवयांचे केस पातळ असतील, तरीही हा हेअरमास्क तुम्ही भुवयांवर लावू शकता.- केसातील कोंडा (hair mask for reducing dandruff) कमी करण्यासाठीही हा हेअरमास्क उपयुक्त ठरतो. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी