Join us  

केस वाढण्यासाठी घरीच करा १ खास तेल, काही दिवसांत केस होतील लांबसडक-दाट आणि सिल्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2024 2:24 PM

Home made hair oil for hair growth : तेलाची निवड करतानाही आपण योग्य ती काळजी घ्यायला हवी.

तेल, शाम्पू, कंडीशनर, सिरम या आपण केसांना लावण्यासाठी वापरत असलेल्या अगदी सामान्य गोष्टी आहेत. आपल्या केसांचा पोत, आपले बजेट, उत्पादनातील कंटेंट या सगळ्याचा विचार करुन आपण ही उत्पादने निवडतो. तेलाच्या बाबतीत आपण जास्त विचार करत नाही आणि साधारणपणे खोबरेल तेल, बदाम तेल असे एखादे तेल आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केसांना लावतो. रात्री झोपताना केसांना मसाज केला की दुसऱ्या दिवशी सकाळी आपण केस धुतो. पण आपण लावलेल्या तेलातून केसांना चांगले पोषण मिळत असते. त्यामुळे तेलाची निवड करतानाही आपण योग्य ती काळजी घ्यायला हवी. आपल्या केसांना, केसांच्या मुळांना पोषण देणारे असे तेल आपण निवडायला हवे. बाजारातले रेडीमेड तेल वापरण्यापेक्षा काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन आपण घरी तेल तयार केले तर केसांसाठी ते जास्त चांगले असते. पाहूयात घरच्या घरी केसांना पोषण देणारे खास तेल कसे तयार करायचे (Home made hair oil for hair growth)...

१. एका कढईत मोहरीचे अर्धी वाटी तेल घ्यायचे आणि ते बारीक गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचे. 

(Image : Google)

२. त्यामध्ये साधारण चमचाभर मेथी दाणे घालायचे. केस वाढण्यासाठी आणि केसांचे चांगले पोषण होण्यासाठी मेथ्या फायदेशीर ठरतात. रक्तप्रवाह सुधारण्यास याची चांगली मदत होते. 

३. यात थोडी रोजमेरीची पानं घालायची. रोजमेरीमध्ये ऑक्सिडंटस असल्याने केसांच्या वाढीसाठी हा घटक अतिशय फायदेशीर असतो. 

३. यात कडीपत्त्याची वाळलेली पाने घालायची. यातून केसांना व्हिटॅमिन्स आणि खनिजं मिळण्यास मदत होते. यामध्ये प्रोटीन आणि बेटा केरोटीन असल्याने मुळांपासून केस मजबूत होण्यास याचा चांगला उपयोग होतो.

४. हे सगळे चांगले गरम करायचे म्हणजे तेलामध्ये इतर पदार्थांचे गुणधर्म उतरण्यास मदत होते.

५. हे तेल गार झाले की एका बरणीमध्ये गाळून ठेवायचे 

६. खूप घट्ट असल्याने त्यामध्ये बदाम तेल किंवा मोहरीचे तेल घालून थोडे पातळ करायचे म्हणजे केसांना लावणे सोपे होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी