Lokmat Sakhi >Beauty > गळून गळून केस पातळ झाले? महिन्याभरात केस वाढण्यासाठी १ खास हेअर पॅक, दिसाल सुंदर...

गळून गळून केस पातळ झाले? महिन्याभरात केस वाढण्यासाठी १ खास हेअर पॅक, दिसाल सुंदर...

Home Made Hair Pack For Hair Growth Hair Care Tips : घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करुन हेअर पॅक तयार केल्यास त्याचा चांगला उपयोग होतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2023 11:38 AM2023-06-14T11:38:12+5:302023-06-14T11:41:23+5:30

Home Made Hair Pack For Hair Growth Hair Care Tips : घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करुन हेअर पॅक तयार केल्यास त्याचा चांगला उपयोग होतो.

Home Made Hair Pack For Hair Growth Hair Care Tips : Thinned hair due to shedding? 1 special hair pack for hair growth within a month, you will look beautiful... | गळून गळून केस पातळ झाले? महिन्याभरात केस वाढण्यासाठी १ खास हेअर पॅक, दिसाल सुंदर...

गळून गळून केस पातळ झाले? महिन्याभरात केस वाढण्यासाठी १ खास हेअर पॅक, दिसाल सुंदर...

केस हे आपल्या सौंदर्यातील एक महत्त्वाचा घटक असतात. केस लांबसडक, दाट असतील तर पाहणाऱ्यांचे त्याकडे आधी लक्ष जाते. अशा मोठ्या केसांच्या आपल्याला वेगवेगळ्या हेअरस्टाईलही करता येत असल्याने लांब केसांसाठी अनेक जण झगडत असतात. मात्र काही ना काही कारणाने केस गळायला लागतात आणि खूप पातळ होऊन जातात. असे केस अनेकदा रुक्ष आणि निर्जीवही दिसायला लागतात. पातळ झालेले केस दिसायला अजिबात चांगले दिसत नाहीत आणि त्याची काही हेअरस्टाईलही करता येत नाही (Home Made Hair Pack Hair Care Tips). 

खराब झालेले केस चांगले होण्यासाठी आपण कधी पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट करतो किंवा कधी विविध प्रकारचे तेल, शाम्पू यांचा वापर करुन केस जाड होण्यासाठी प्रयत्न करतो. मात्र त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही यामध्ये पैसेही मोठ्या प्रमाणात जात असल्याने आर्थिक तोटा होतो तो वेगळाच. पण केसांचे योग्य पद्धतीने पोषण होत नसेल तर हे प्रयोग करुनही केस म्हणावे तसे वाढतच नाहीत. अशावेळी घरच्या घरी काही नैसर्गिक उपाय केल्यास त्याचा केसांच्या वाढीसाठी अतिशय चांगला उपयोग होतो. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करुन हेअर पॅक तयार केल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. पाहूयात घरच्या घरी हेअर पॅक तयार करण्याची सोपी पद्धती...

(Image : Google)
(Image : Google)

१. एका बाऊलमध्ये १ चमचा मेथ्या, १ चमचा जवस आणि १ चमचा तांदूळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचे. 

२. दुसऱ्या दिवशी सकाळी हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करुन त्याची पेस्ट करुन घ्यायची. 

३. ही पेस्ट गाळून त्याची मऊसर पेस्ट एका बाऊलमध्ये घेऊन त्यात चमचाभर दही घालायचे. 

४. यामध्ये साधारण १ ते १.५ चमचा ऑलिव्ह ऑईल घालून मिश्रण एकजीव करुन घ्यायचे. 

५. हे मिश्रण केसांच्या मुळांना आणि केसांना आपण हेअर पॅक लावतो त्याप्रमाणे नीट लावून घ्यायचे. 

६. साधारणपणे ३० मिनीटांसाठी हे मिश्रण केसांवर तसेच ठेवून नंतर केस नेहमीप्रमाणे धुवायचे. 

७. यामुळे केस भरभर वाढण्यास मदत होईल आणि केसांचा पोतही सुधारेल.

Web Title: Home Made Hair Pack For Hair Growth Hair Care Tips : Thinned hair due to shedding? 1 special hair pack for hair growth within a month, you will look beautiful...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.