Lokmat Sakhi >Beauty > पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट कशाला? घरीच करा केसांना नॅचरल हेअर स्पा; पाहा सोपी पद्धत…

पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट कशाला? घरीच करा केसांना नॅचरल हेअर स्पा; पाहा सोपी पद्धत…

Home Made Hair Spa Treatment for Silky and Shiny Hair Hair Care Tips : नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन हेअर स्पा केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2023 12:17 PM2023-07-30T12:17:50+5:302023-07-30T12:19:28+5:30

Home Made Hair Spa Treatment for Silky and Shiny Hair Hair Care Tips : नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन हेअर स्पा केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो...

Home Made Hair Spa Treatment for Silky and Shiny Hair Hair Care Tips : Why expensive parlor treatments? Do it at home natural hair spa; Check out the easy way… | पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट कशाला? घरीच करा केसांना नॅचरल हेअर स्पा; पाहा सोपी पद्धत…

पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट कशाला? घरीच करा केसांना नॅचरल हेअर स्पा; पाहा सोपी पद्धत…

आपले केस कधी खूप रुक्ष होतात तर कधी अचानक खूप गळायला लागल्याने पातळ होतात. मात्र टिव्ही किंवा चित्रपटात दिसणाऱ्या अभिनेत्रींप्रमाणे आपले केस लांबसडक, दाट, काळेभोर आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सिल्की असावेत अशी आपली इच्छा असते. पण प्रदूषण, केसांना अन्नातून मिळणारे पोषण, रासायनिक पदार्थांचा अतिवापर यांमुळे केसांचा पोत बिघडतो. एकदा केस खराब झाले की ते पुन्हा आधीसारखे होण्यास बराच वेळ लागतो. केस हा सौंदर्पयातील महत्त्वाचा घटक असल्याने केस चांगले नसतील तर आपल्या सौंदर्यात त्यामुळे बाधा येते. मग आपण कधी पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंटस घेतो तर कधी बाजारात मिळणारी महागडी प्रसाधने वापरुन ते चांगले करण्याचा प्रयत्न करतो (Home Made Hair Spa Treatment for Silky and Shiny Hair Hair Care Tips). 

यामुळे तात्पुरते उपाय होत असतील तरी कायमचे उपचार होत नाहीत आणि केसांचा पोत दिवसेंदिवस आणखीनच खराब होत जातो. अशावेळी घरच्या घरी नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन केसांवर उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. पार्लरमध्ये आपण हेअर स्पा वर हजारो रुपये खर्च करतो, त्यापेक्षा घरीच हेअर स्पा केला तर त्याचा निश्चितच चांगला उपयोग होतो. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करुन अगदी झटपट होणारा हा स्पा नेमका कसा करायचा ते पाहूया. यामुळे केसांचे गळणे कमी होऊन केसांची वाढ होण्यास आणि ते सिल्की होण्यासही चांगली मदत होते. 

१. एका बाऊलमध्ये २ चमचे मेथ्या घेऊन त्या पूर्ण पाण्यात भिजतील इतके पाणी घालायचे. यामध्ये कोरफडीचा गर घालून हे मिश्रण रात्रभर तसेच ठेवायचे. 

२. सकाळी हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करुन घ्यायचे आणि त्यामध्ये 1 चमचा एरंडेल तेल घालायचे. 

३. रात्रभर केसांना तेल लावून ठेवायचे आणि सकाळी ही पेस्ट केसांना सगळ्या बाजुने लावायची. 


४. दर आठवड्याला ही पेस्ट केसांना लावल्यास त्याचा केस सिल्की आणि शायनी होण्यासाठी चांगला फायदा होतो. 

५. साधारणपणे १ तास ही पेस्ट केसांना लावून मग केस शाम्पूने धुवून टाकायचे. 

६. यामुळे केस गळण्याची समस्या दूर होते आणि केसांची वेगाने वाढ होण्यासही मदत होते.        

Web Title: Home Made Hair Spa Treatment for Silky and Shiny Hair Hair Care Tips : Why expensive parlor treatments? Do it at home natural hair spa; Check out the easy way…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.