सध्या केसांची समस्या खूपच जास्त वाढली आहे. कुणाचे केस कमी वयातच पांढरे होत आहेत, तर कुणाचे केस खूपच जास्त गळत (hair loss) आहेत. काही जणांचे केस तर एवढे जास्त गळतात की लवकरच टक्कल पडेल की काय, अशी भीती वाटायला लागते. केस गळण्यामागची २ महत्त्वाची कारणं म्हणजे एकतर केसांची व्यवस्थित निगा राखण्यात आपण कमी पडतो. किंवा दुसरं कारण म्हणजे केसांना आपल्या आहारातून किंवा आपण जे हेअर कॉस्मेटिक्स वापरतो, त्यातून योग्य प्रमाणात पोषण मिळत नाही. म्हणूनच आहारातून केसांना पोषण देण्यासाठी आपल्या स्वयंपाक घरातील काही पौष्टिक पदार्थ वापरून केसांसाठी हेल्दी पावडर तयार करा आणि दुधासोबत घ्या.(health drink for controlling hair fall)
केसांसाठी हेल्दी पावडर कशी तयार करायची?
ही माहिती इन्स्टाग्रामच्या adonhaircare या पेजवर हेअर ट्रान्सप्लान्ट सर्जन, हेअर एक्सपर्ट यांच्याकडून शेअर करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी एक व्हिडिओ तयार केला असून केसांसाठी नेमके कोणकोणते पदार्थ आपल्या आहारात दररोज असण्याची गरज आहे, याविषयी सांगितले आहे.
परफेक्ट वेटलॉस ड्रिंक, सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची खास रेसिपी, वजन झटपट कमी होईल
१. ही पावडर तयार करण्यासाठी फुटाणे, शेंगदाणे, बदाम, काजू, अक्रोड, मखाना, भोपळ्याच्या बिया, मीरे, गूळ एवढे साहित्य लागणार आहे.
२. फुटाणे, शेंगदाणे हे सारख्या प्रमाणात घ्या. त्याच्या निम्म्या प्रमाणात बदाम, काजू, अक्रोड घ्या. त्याच्याही निम्म्या प्रमाणात भोपळ्याच्या बिया घ्या. मीरे १ टेबलस्पून तर चवीनुसार गूळ घ्यावा.
३. गूळ सोडून वरील सर्व साहित्य मध्यम आचेवर ३ ते ४ मिनिटे भाजून घ्यावे.
४. थंड झाल्यानंतर मिक्सरमधून फिरवावे आणि त्याची बारीक पावडर करावी. त्यात चवीनुसार गूळ टाकावा.
५. रोज गरम दुधामध्ये ही पावडर १ चमचा टाकून प्यावी. यामुळे केस मजबूत होऊन त्यांचं गळणं तर कमी होईलच पण आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होईल.